शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 07:52 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पार्थिव शरीरावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतले अनेक रस्ते आज बंद राहणार आहेत.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पार्थिव शरीरावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतले अनेक रस्ते आज बंद राहणार आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड आणि पंजाबमध्ये शुक्रवारी सरकारी कार्यालयं आणि स्कूल-कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनावर सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये आज सरकारी कार्यालयं, स्कूल आणि कॉलेज बंद राहणार आहेत. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अटलबिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 8 आठवड्यांहून अधिक काळ त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही टि्वटरवरून दुःख व्यक्त केलं आहे. दिल्ली सरकारमधील सर्व कार्यालयं, शाळा-कॉलेज आणि इतर संस्था अटलजींच्या निधनाच्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार आहेत, अशीही माहिती सिसोदिया यांनी दिली. योगी सरकारनं वाजपेयींच्या निधनावर राज्यात सात दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. यादरम्यान सर्व सरकारी भवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली आणण्यात आला.योगी आदित्यनाथ म्हणाले, वाजपेयींचं प्रेरणास्थान असलेलं बटेश्वर, शिक्षण क्षेत्रासाठी नावाजलेलं असलेलं कानपूर, अटलजींच्या पहिल्या खासदारकीचं क्षेत्र बलरामपूर आणि कर्मभूमी लखनऊमध्ये त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी विशेष कार्य केलं जाणार आहे. त्यांच्या अस्थी प्रत्येक जिल्ह्यातील पवित्र नद्यांमध्ये विसर्जित केली जाणार आहे. वर्ष 1999 ते 2004पर्यंत माजी पंतप्रधान वाजपेयी हे लखनऊमधून खासदार राहिले होते. रेल्वे बोर्डानंही टेक्निशियनसाठी घेण्यात येणारी परीक्षा रद्द केली आली असून, केंद्र सरकारनं सर्व कार्यालयांत हाफ डे जाहीर केला आहे. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीAIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश