Atal Bihari Vajpayee Death : मुझे मृत्यू से डर नही है! डर है तो बदनामीसे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:30 IST2018-08-16T18:23:57+5:302018-08-16T18:30:18+5:30
Atal Bihari Vajpayee Death : भगवान रामाचे स्मरण करत मला मृत्यूची भीती नाही, मला भीती आहे फक्त बदनामीची, असं सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

Atal Bihari Vajpayee Death : मुझे मृत्यू से डर नही है! डर है तो बदनामीसे!
मुंबई : अटलबिहारी वाजपेयी. २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या या व्यक्तीने सलग सात दशके भारतीय राजकीय आणि सामाजिक जीवनावर आपला अमिट ठसा उमटवला. राजकारणात केवळ सत्ताप्राप्तीसाठी आपण आलो नाही, तर देशसेवेसाठी आलो हे ठणकावून सांगण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती.
१९९६ साली राष्ट्रपतींनी त्यांना सर्वाधिक जागा मिळवणा-या पक्षाचा नेता म्हणून सरकार स्थापन करण्यास आमंत्रित केले व इतर पक्षांशी बोलण्यास अवधी दिला. मात्र वाजपेयी यांना सत्तेची हाव सुटली आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून होऊ लागताच मुदत संपण्याआधीच वाजपेयी यांनी लोकसभेत शक्ती परीक्षणास सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस बोलताना वाजपेयी म्हणाले होते, माझ्यावर सत्तेचा मोह झाल्याचा आरोप होत आहे. पण संशय निर्माण होऊ नये म्हणूनच मी मुदतपूर्व शक्ती परीक्षणाला सामोरे जायचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांनी स्वतःचा पक्ष मोडून आमच्या मदतीने सरकार तयार केले होते. पण स्वतःचा पक्ष मोडून सत्ता चालून आली तर मी त्या सत्तेला चिमटीनेही स्पर्श करणार नाही, असे बाणेदार उत्तर वाजपेयी यांनी दिले होते. भगवान रामाचे स्मरण करत मला मृत्यूची भीती नाही, मला भीती आहे फक्त बदनामीची, असं सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. पण लोकसभेसह देशातल्या मोठ्या वर्गाची मने जिंकली.
(Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!)
‘बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ
पॉंवो के नीचे अंगारे
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ
निज हाथों में हँसते-हँसते
आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा’’
वाजपेयी यांचे हे भाषण विशेष गाजले. काही काळापुरते त्यांना पंतप्रधानपदापासून लांब राहावे लागले तरी पुढे त्यांनी आघाडी सरकार यशस्वीरीत्या सांभाळले. विविध प्रांतातल्या विविध प्रादेशिक पक्षांबरोबर मिळतेजुळते घेत आघाडीचा एक नवा प्रयोग त्यांनी पूर्णकाळ तडीस नेला. हे सर्वांना बरोबर घेऊन जाणंच त्यांच्या वेगळेपणाचं दर्शक आहे.
(Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास)