माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 14:11 IST2018-06-11T14:04:57+5:302018-06-11T14:11:43+5:30
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने यासंदर्भात पत्रक काढून माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी करण्यात येणार आहे.
93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. सध्या ते राजकाणापासून अलिप्त असून त्यांनी भारतीय जनसंघाचे नेते म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तसेच, 1957 मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले होते. त्यानंतर राजकीय आणि सरकारमधील अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत.