Atal Bihari Vajpayee: महान राजकारणी, दूरदर्शी विचारक गमावलाः विजय दर्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 21:17 IST2018-08-16T21:16:54+5:302018-08-16T21:17:17+5:30
Atal Bihari Vajpayee Death: यवतमाळ येथील माझ्या घरी त्यांच्यासोबत झालेली भेट अतिशय स्मरणीय होती.

Atal Bihari Vajpayee: महान राजकारणी, दूरदर्शी विचारक गमावलाः विजय दर्डा
आपण एक महान राजकारणी, दूरदर्शी विचारक आणि शांततेचा संदेश घेऊन सत्याची ज्योत वाहून नेणारा राजकीय नेता गमावला आहे. ते पंतप्रधान आणि मी संसदेचा सदस्य असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. यवतमाळ येथील माझ्या घरी त्यांच्यासोबत झालेली भेट अतिशय स्मरणीय होती. त्यांच्या निधनानंतर, आम्ही देशाचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व व प्रिय पुत्रांपैकी एक गमावला आहे. नि:संदेह सर्वोत्तम पंतप्रधानांंपैकी ते एक होते. त्यांनी कठीण परिस्थितीत देशाचे नेतृत्त्व केले, हे आमचे भाग्य आहे. देशवासीयांनी ज्यांना प्रेमाने अटलजी संबोधले होते, त्यांचे नेहमीच महान नेत्यांपैकी एक म्हणून स्मरण केले जाईल. त्यांनी नेहमीच राष्ट्राला स्वत:च्या आधी ठेवले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी श्रद्धांजली लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी वाहिली.