शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Assembly Election: कोण मुख्यमंत्री? राजस्थानात काँग्रेस-भाजपसमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 06:22 IST

Assembly Election: राजस्थानमध्ये काँग्रेस किंवा भाजपचे सरकार आले तरी मुख्यमंत्री निवडताना दोन्ही पक्षांसमोर पेच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दोन्ही पक्षांत थेट मुकाबला आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली - राजस्थानमध्येकाँग्रेस किंवा भाजपचे सरकार आले तरी मुख्यमंत्री निवडताना दोन्ही पक्षांसमोर पेच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दोन्ही पक्षांत थेट मुकाबला आहे. तिन्ही राज्यांत भाजपने कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. काँग्रेसनेही मध्य प्रदेशात कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे. परंतु, छत्तीसगड व राजस्थानमध्ये कोणत्याही नेत्यांबाबत अशी घोषणा केलेली नाही.

राजस्थानात द्विधा मन:स्थिती दोन्ही पक्षांना सर्वांत जास्त आव्हानांची स्थिती यावेळी राजस्थानमध्ये असणार आहे. काँग्रेसचेच सरकार पुन्हा सत्तेत आले तर पुन्हा अशोक गेहलोत मुख्यमंत्री होतात किंवा सचिन पायलट यांच्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करतात, हे पाहावे लागेल. सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण, याबाबत राजस्थान भाजपमध्ये द्विधा स्थिती आहे. वसुंधरा राजे यांना भाजपचे नेतृत्व मुख्यमंत्री करू इच्छित नाही. उर्वरित नेत्यांमध्ये गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, ओम बिरला याबरोबरच आणखी एक नाव समोर येत आहे. आणि ते म्हणजे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव. ते मूळचे राजस्थानचे आहेत. 

छत्तीसगडमध्ये रमण सिंह हाच पर्याय - छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भलेही भूपेश बघेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर आणले नसले तरी महादेव ॲपमध्ये त्यांचे नाव आलेले आहे. परंतु, आमदारांचे पाठबळ बघेल यांच्या पाठीशी जास्त आहे. - अशा स्थितीत टी. एस. सिंहदेव शर्यतीत खूपच मागे आहेत. भाजप छत्तीसगडमध्ये नेताविहीन आहे. रमण सिंह नसतील तर कोणताही पर्याय दिसत नाही. 

मध्य प्रदेशात चित्र स्पष्ट मध्य प्रदेशात चित्र बरेचसे स्पष्ट झालेले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास कमलनाथ मुख्यमंत्री होतील आणि भाजपचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदासाठी सर्वांत मजबूत दावेदार केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल असू शकतील. ते ओबीसीतून येतात. शिवराज सिंह चौहान यांना दोन्ही स्थितीत यावेळी केंद्रात जावे लागेल, अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमरही मजबूत दावेदार होते. परंतु, त्यांच्या पुत्राबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्यांचा दावा कमजोर झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित दावेदारांमध्ये कैलाश विजयवर्गीय, नरोत्तम मिश्रा हे ओबीसी नसल्यामुळे मागे पडले आहेत.

राजस्थानमध्ये ६८ टक्के मतदानजयपूर - राजस्थानमध्ये २०० सदस्यांच्या राज्य विधानसभेच्या १९९ जागांसाठी ६८ टक्के मतदान झाले आहे. राज्यात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. काही भागांत वेगवेगळ्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ वाद झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजता मतदान समाप्त झाले. सिरोही जिल्ह्यातील चारवली गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. 

राज्यात एकूण ३६,१०१ ठिकाणी ५० हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. पाच कोटी २६ लाखांहून अधिक मतदार आहेत. एकूण १,८६२ उमेदवार रिंगणात आहेत. ७०,००० पोलिस कर्मचाऱ्यांसह १.७० लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काँग्रेसविरोधात सत्ताविरोधी लाट नाही. पक्ष राज्यात पुन्हा सरकार स्थापन करेल, असे दिसते काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल.    - अशोक गेहलोत, मुख्यमंत्रीप्रत्यक्षात अंडरकरंट आहे; पण तो भाजपच्या बाजूने आहे. ३ डिसेंबरला भाजपचे कमळ फुलणार आहे.    - वसुंधरा राजे, भाजप ज्येष्ठ नेत्या

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगड