शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

UP Assembly Election : भाजपची गेमचेंजर खेळी? 107 पैकी 60 टक्के OBC-SC उमेदवार उतरवले मैदानात, असं आहे जातीय गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 18:10 IST

भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने 107 पैकी 21 नवीन चेहऱ्यांवर डाव लावला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक-2022 साठी आता सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी भाजपने 107 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर केली. त्याच वेळी, या संपूर्ण यादीतील सर्वात खास नाव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दिसले. योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिराथू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यांपैकी 57 जागांसाठी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठीही 55 पैकी 48 जागांसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने 107 पैकी 21 नवीन चेहऱ्यांवर डाव लावला आहे. तर 63 विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवला आहे. 

43 टक्के तिकिटे सामान्य वर्गाला -तिकीट वाटपात भाजपने प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने 43 टक्के तिकिटे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना दिली आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातील एका जागेवर अनुसूचित जातीच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. 68 टक्के उमेदवारांमध्ये दलित, अनुसूचित जाती आणि महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. जातीच्या आधारावर याचा विचार करता, 44 जागांवर ओबीसी उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. 19 जागांवर अनुसूचित जाती, तर 10 जागांवर महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. 

कुठल्या प्रवर्गातील किती उमेदवार - सर्वसाधारण गटातही भाजपने 17 जागांवर ठाकूर, 10 जागांवर ब्राह्मण, 8 जागांवर वैश्य, तीन जागांवर पंजाबी, दोन जागांवर त्यागी आणि दोन जागांवर कायस्थ यांना तिकीट दिले आहे. 44 ओबीसी उमेदवारांमध्ये 16 जाट, 7 गुर्जर, 6 लोधी, 5 सैनी, 2 शाक्य, 1 खडगवंशी, 1 मौर्य, 1 कुर्मी, 1 कुशवाह, 1 प्रजापती, 1 यादव आणि 1 निषाद प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जातीच्या प्रतिनिधीत्वाबद्दल बोलायचे तर 13 उमेदवार जाटव प्रवर्गातील आहेत. 2 वाल्मिकी, 1 बंजारा, 1 धोबी, 1 पासी आणि एक सोनकर वर्गातील आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा