शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

या राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले, पेट्रोल-डिझेल तब्बल पाच रुपयांनी स्वस्त झाले

By बाळकृष्ण परब | Published: February 12, 2021 4:01 PM

petrol-diesel Price News : पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले किंवा स्थिरावले की निवडणुका जवळ आल्या असे समजून जावे, असे आपल्याकडे म्हटले जाते.

गुवाहाटी - पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले किंवा स्थिरावले की निवडणुका जवळ आल्या असे समजून जावे, असे आपल्याकडे म्हटले जाते. याचाच प्रत्यय आसाममध्ये येत आहे. आसाममध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक (Assam Assembly Election 2021) होणार आहे. मात्र निवडणुकीला काही महिने असतानाचा राज्यात पेट्रोल आणि मद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर कपात झाली आहे. नवे दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत. आसाम सरकारने आज याबाबतची माहिती दिली आहे. (In Assam petrol-diesel has become cheaper by five rupees)पेट्रोल-डिझेल आणि मद्याचे दर कमी करण्याचा निर्णय हा विधानसभा निवडणुकीला महिनाभराचा अवधी असताना घेतला गेला आहे. या निर्णयानुसार आसाममध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर मद्यावर आकारण्यात येणारा करही २५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. आसामचे वित्तमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी या निर्णयाची विधानसभेत घोषणा केली.कोविड-१९ चा फैलाव शिखरावर असताना पेट्रोल-डिझेल आणि मद्यावर अतिरिक्त सेस आकारण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी होत आहे. त्या पा्र्श्वभूमीवर कॅबिनेटने आज सकाळी अतिरिक्त सेस हटवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यात पेट्रोल आणि डिझेल पाच रुपये प्रति लिटरने स्वस्त होईल. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगाने वाढत आहेत. मात्र यापूर्वी सुमारे एक महिन्यापर्यंत या किमतीत काहीही बदल झालेला नव्हता. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा प्रभाव घरगुती बाजारावरही पडत आहे. जगभरातील विविध भागात कोविड-१९ च्या लसीकरणामुळे तेलाची मागणी वाढली आहे.आसाममध्ये एप्रिल-मे महिन्यादरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आपली राज्यातील सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात आहे.

टॅग्स :AssamआसामElectionनिवडणूकPetrolपेट्रोलDieselडिझेल