शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

Assam-Mizoram Clash: आसाम-मिझोरम वादावरून राहुल गांधी भडकले; अमित शाहंवर 'अशा' शब्दात साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 10:22 IST

सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Assam-Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah)

नवी दिल्ली - इशान्येकडील आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांत सीमावादावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. ही घटना म्हणजे अमित शाह यांचे अपयश असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांच्यामुळेच लोकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण झाला, असेही ते म्हणाले. याच वेळी, त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली. (Assam Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah and gives condolences to the families of those who have been killed)

सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, "या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती मी आपली संवेदना व्यक्त करतो. याच बरोबर जखमी लोक लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा गृह मंत्र्याचे अपयश समोर आले आहे. ते देशातील नागरिकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम करत आहेत. यामुळे भारत आता खराब परिस्थितीचा सामना करत आहे." राहुल यांनी आपल्या या ट्विटसोबत घटनेचा व्हिडिओही जोडला आहे.

काय म्हणतायत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री -आसाम-मिझोरम सीमेवर झालेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांना जबाबदार धरले आहे. मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांचे पोलीस शांतता राखतील असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांनी ट्विटरवरून दिली. तर मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी आसामच्या पोलिसांनी लाठीमार करून अश्रूधूर सोडल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शहाAssamआसामmizoram-pcमिजोरमcongressकाँग्रेसBJPभाजपा