शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला मिळणार दररोज १०० रुपये, आसाम सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 14:33 IST

assam government decision : मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे, असे आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

ठळक मुद्देजानेवारीअखेरपर्यंत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थीनींच्या बँक खात्यात १,५०० आणि २ हजार रुपये जमा केले जातील.

गुवाहटी : मुलींना शाळेत जाण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असते. तसेच, त्यांना पाठिंबा देण्याची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आसाम सरकारने एक चांगला निर्णय घेतला असून त्याचे सोशल मीडियावर कौतुकही होत आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, आसाममध्ये शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला वर्गामध्ये येण्यासाठी दररोज 100 रुपये मिळणार आहेत. एजन्सीच्या अहवालानुसार, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे, असे आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

याचबरोबर, चालू महिन्याच्या अखेरीस दिवसाला १०० रुपयांची योजना सुरू केली जाईल. इतकेच नाही तर राज्य सरकार १२ वीच्या बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना प्रज्ञान भारती योजनेंतर्गत २२,००० दुचाकींचे वाटप करणार आहे, असेही शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.

या योजनेसाठी १४४.३० कोटी रुपये खर्च केले जातील.  राज्य बोर्डातून प्रथम श्रेणी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थीनींना सरकार स्कूटर भेट देणार आहे. जर विद्यार्थीनींची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असेल तरीही सरकार त्यांना स्कूटर देणार आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये प्रथम श्रेणीमध्ये इयत्ता १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थीनींना देखील स्कूटर दिली जाणार आहे, असे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

'यांना' मिळाणार दोन हजार रुपये शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीअखेरपर्यंत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थीनींच्या बँक खात्यात १,५०० आणि २ हजार रुपये जमा केले जातील. ही रक्कम त्यांच्या पुस्तक आणि इतर अभ्यास सामग्री इत्यादींच्या खरेदीसाठी उपयुक्त ठरेल. गेल्या वर्षी सरकार या दोन्ही आर्थिक प्रोत्साहन योजना सुरू करणार होती, परंतु कोरोनामुळे सुरू होऊ शकली नाही. आता सरकार तातडीने या योजनेची अंमलबजावणी २०२१ पासून सुरू करणार आहे. 

टॅग्स :SchoolशाळाAssamआसामEducationशिक्षण