आसामला पुन्हा पुराचे संकट; ७० हजार लोकांना फटका, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 17:02 IST2022-10-13T17:01:26+5:302022-10-13T17:02:50+5:30
आसामला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला आहे. मागील चार दिवसापासून सुरू असललेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.

आसामला पुन्हा पुराचे संकट; ७० हजार लोकांना फटका, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली
गुवाहाटी: आसामला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला आहे. मागील चार दिवसापासून सुरू असललेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. ७० हजार लोकांना या पुराचा फटका बसला असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आसाम राज्याला पुराने वेढले होते. यावेळी मोठे नुकसान झाले होते. आता परतीच्या पावसातही पूराचा धोका वाढला आहे.
मान्सून परतीच्या पावसाने अनेक राज्यांना झोडपले आहे. आसाम राज्यातही मागील चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. आसाममधील ११० गावे पुरात अडकली आहेत. धेमाजी हा जिल्हा जास्त प्रभावित झाला आहे. या जिल्ह्यात ७६५ गावांचा समावेश होतो. यातील ३ हाजर हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. या वर्षी आसामला तीन वेळा पुराचा फटका बसला आहे. या पावसामुळे ११० गावांना फटका बसला असून, ६९ हजार ७५० लोकांना या पुराचा फटका बसला आहे.
देशातील काही राज्यांना मागील चार दिवसापासून पावसाने झोडपले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच महाराष्ट्रतील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.