शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

आसाम : काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 05:54 IST

सहकारी पक्षांच्या साथीने भाजपला सत्तेतून बाहेर करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आसाममध्ये २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३०.९ टक्के मतांसह १२६ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या. भाजपने २९.५ टक्के मते आणि ६० जागा जिंकत सत्ता हस्तगत केली होती. 

भाजपचे सहकारी आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी १२ टक्के मतांसह १४ आणि १२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे सत्ताधारी आघाडी ८६ पर्यंत पोहोचली. मागील निवडणुकीत सत्ता गमावलेल्या काँग्रेसने तत्पूर्वी १५ वर्षे राज्यात सरकार चालविले आहे. यंदा बहुपक्षीय आघाडीच्या आधारे सत्तेत परत येण्याची अपेक्षा पक्षाला आहे. जानेवारीत पक्षाने लोकसभा सदस्य बद्रुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफसोबत तसेच, भाकप, माकपा यांच्यासोबत आघाडी केली आहे. २०१६ पासून आतापर्यंत काँग्रेसची सदस्यसंख्या १९ वर पोहोचली आहे. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झाले. हा पक्षासाठी मोठा झटका होता. पक्षाचे दोन आमदार निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. 

द्रमुकने जाहीर केले १७३ उमेदवार 

चेन्नई : तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी १७३ उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली. स्टॅलिन हे पुन्हा एकदा कोलाथूर मतदार संघातून नशीब अजमावणार आहेत. त्यांचे पुत्र उदयनिधी हे चेपक-त्रिपलिकाने येथून निवडणूक लढवणार आहेत. ज्येष्ठ नेते दुरई मुरुगन, के. एन. नेहरू, के. पोनमुडी आणि एमआरके पनीरसेल्वम यांच्यासह ७९ विद्यमान आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. 

कमल हसन कोइम्बतूरमधून लढणारnअभिनेता ते नेता असा प्रवास करणारे कमल हसन तामिळनाडूत कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. nमक्कल निधि मय्यमच्या अध्यक्षांनी शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दिवंगत वडील श्रीनिवासन यांची आठवण करत कमल हसन यांनी विश्वास व्यक्त केला की, लोक आपल्याला विधानसभेत पाठवतील. 

टॅग्स :congressकाँग्रेसAssamआसामElectionनिवडणूक