मनीष सिसोदियांवर मानहानीचा खटला, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने मागितली 100 कोटींची नुकसान भरपाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 15:25 IST2022-06-22T15:17:37+5:302022-06-22T15:25:04+5:30
Manish Sisodia : आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुईया सरमा यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

मनीष सिसोदियांवर मानहानीचा खटला, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने मागितली 100 कोटींची नुकसान भरपाई!
नवी दिल्ली : दिल्लीतआप सरकारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुईया सरमा यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
गुवाहाटी येथील दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात रिंकी भुईया सरमा यांनी मानहानीचा खटला दाखल केला असून नुकसानभरपाई म्हणून १०० कोटी रुपयांची मागणीही केली आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुयान सरमा यांनी मंगळवारी पीपीई किटच्या मुद्द्यावरून दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयात 22 जून रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. रिंकी भुयान सरमा यांचे वकील पी नायक यांनी सांगितले की, रिंकी भुयान सरमा यांनी एफआयआर दाखल केला आहे.
अलीकडेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर पीपीई किटच्या कंत्राटाबाबत भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. हेमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या व्यावसायिक भागीदारांच्या कंपन्यांना २०२० मध्ये पीपीई किटच्या पुरवठ्यासाठी बाजार दरापेक्षा जास्त दराने सरकारी कंत्राटे दिली होती, असा आरोप मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत केला होता. दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांच्या आरोपानंतर हेमंत बिस्वा सरमा म्हणाले होते की, माझ्या पत्नीने एक पैसाही न घेता सरकारला १५०० पीपीई किट्स दान केल्या होत्या. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.