शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

तब्बल १५ वर्षे पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या पक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी 'हात'मिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 09:07 IST

assam assembly election 2021: आणखी एका मित्रपक्षानं सोडली भाजपची साथ; निवडणुकीपूर्वी धरला काँग्रेसचा हात

नवी दिल्ली: शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आणखी एका पक्षानं भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे. त्यामुळे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) आणखी एक पक्ष कमी झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या मित्रपक्षांची संख्या कमी होत आहे. त्यात आता आणखी एका पक्षाची भर पडली आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आसाममधील मित्रपक्षानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपपासून दूर जात थेट काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. (BJP Ally BPF Joins Congress Alliance Before Polls)आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी आसाममध्ये मतदान होईल. आसाममधील विधानसभा निवडणुकीचं (Assam Assembly Election 2021) वेळापत्रक जाहीर होताच सत्ताधारी भाजपला धक्का बसला. गेल्या ५ वर्षांपासून भाजपसोबत सत्तेत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंटनं (BPF) काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीशी हातमिळवणी केली. बीपीएफनं भाजपची साथ सोडल्याचा फटका सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत बसू शकतो.पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचारबोडोलँड पट्ट्यात बोडोलँड पीपल्स फ्रंटचं प्राबल्य आहे. २००६ पासून हा पक्ष या पट्ट्यातल्या १२ पैकी १२ जागा जिंकत आला आहे. याच पक्षानं आता काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष हगरामा मोहिलारी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. 'शांतता, एकता आणि विकासासाठी काम करण्यासाठी बीपीएफनं आगामी विधानसभा निवडणुकीत महाजाथशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसोबत आता आमची मैत्री किंवा युती राहिलेली नाही,' असं मोहिलारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासूनच भाजप आणि बीपीएफ यांचे संबंध बिघडले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बोडोलँड टेरिटोरियल काऊन्सिलच्या निवडणुकीत भाजपनं बीपीएफला सोबत घेतलं नाही. त्या निवडणुकीत बीपीएफला १७, भाजपला ९ तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलला (यूपीपीएल) १२ जागा मिळाल्या.सर्व्हे : बंगालमध्ये 'दीदीं'ची हॅट्रिक, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत; जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकारबीपीएफनं भाजपची साथ सोडल्यानं काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा विस्तार झाला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीत बीपीएफसोबतच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचाही (राजद) समावेश झाला आहे. एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम (एम-एल) आणि आंचलिक गण मोर्चा (एजीएम) हे पक्ष आधीपासून काँग्रेसप्रणित आघाडीत आहेत.

 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेस