हरयाणात आणखी एका पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:37 IST2025-10-17T18:36:27+5:302025-10-17T18:37:16+5:30
ASI Suicide in Haryana: मागील काही दिवसात हरयाणा पोलिस विभागातील IPS पूरन कुमार यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांनी आयुष्य संपवले आहे.

हरयाणात आणखी एका पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; कारण काय..?
हरयाणामध्येपोलिसांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. IPS वाय पूरन कुमार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप लाठर यांच्यानंतर, आता आणखी एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रेवाडीमध्ये तैनात हरयाणा पोलिस विभागातील एएसआयने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय कृष्ण यादव गुरुग्राम पोलिसात एएसआय पदावर तैनात होते. त्यांनी जैनाबादमधील आपल्या घरात आत्महत्या केली आहे. पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून, त्यात संबंधित अधिकाऱ्याने आपल्या पत्नीवर मानसिक त्रासाचा आरोप केला आहे. त्यांची पत्नी दिल्लीमध्ये शिक्षिका आहे.
दहिना पोलिस स्टेशनचे प्रभारी रजनीश यांच्या म्हणण्यानुसार, सुसाईड नोटमध्ये एएसआयने आपल्या पत्नीवर छळाचा आरोप केला आहे. यावरुन सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
संबधित बातमी- हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप