VIDEO: ...अन् आसारामची 'ती' इच्छा पूर्ण झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 16:26 IST2018-04-27T16:26:25+5:302018-04-27T16:26:50+5:30

आसारामचे 'ते' शब्द खरे ठरले

asarams that wish becomes true after he got lifetime imprisonment in rape case | VIDEO: ...अन् आसारामची 'ती' इच्छा पूर्ण झाली

VIDEO: ...अन् आसारामची 'ती' इच्छा पूर्ण झाली

मुंबई: 'मला जेलमध्ये जावंसं वाटतंय. काय माहीत कोणत्या निमित्तानं जाईन किंवा असंच सहज जाईन,' असं काही वर्षांपूर्वी खुद्द आसाराम बापूनं म्हटलं होतं. आसारामचे हे शब्द खरे आता खरे ठरले आहेत. तुरुंगाची हवा खाण्याची आसारामची जुनी इच्छा पूर्ण झालीय. काही वर्षांपूर्वीचा आसारामचा 'तो' व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आपण देवाकडे कधीकधी मस्करीत काहीतरी इच्छा व्यक्त करतो. मात्र देवानं त्या इच्छा गांभीर्यानं घेतल्या की असं होतं,' अशा मेसेजसह सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय.. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.

'मला तिहारच्या तुरुंगात जाण्याची इच्छा होतेय. आता काय माहीत, कोणत्या निमित्तानं जाईन. किंवा मग असंच तुरुंगात जाईन. सरकारनं अशी कोणती तरी योजना करावी आणि मला तिहारच्या तुरुंगात राहण्याची परवानगी द्यावी. संपूर्ण तुरुंगाचा कायापालट करेन,' असं या व्हिडिओमध्ये आसाराम बोलताना दिसतोय. यानंतर आसाराम त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी आलेल्या अनुयायांना, मी तुरुंगात जाऊ ना? कोणत्या तुरुंगात जाऊ? तिहारच्या की साबरमतीच्या?, असे प्रश्न विचारतो. आसारामच्या या प्रश्नांनंतर अनुयायी, 'तुरुंगात जाऊ नका,' असं म्हणतात. 



यानंतर आसाराम अनेक मोठ्या व्यक्ती तुरुंगात जाऊन आल्याचं सांगतो. मलाही तुरुंगाची मजा घ्यायचीय, असंही तो म्हणतो. मी एकदा हेलिकॉप्टरनं तिहार तुरुंगाच्यावरुन फिरुन आलो, असंही तो यावेळी त्याच्या अनुयायांना सांगतो. 'तिहार तुरुंग नेमका कसा आहे, हे मी बघून आलोय. कधी जाण्याची वेळ आली, तर माहित असावा ना,' असं या व्हिडिओत आसारामनं म्हटलंय. कैद्यासारखं नाही, तर शहनशाहसारखं तुरुंगात जाईन, असंही आसाराम पुढे बोलताना म्हणाला. यानंतर अनुयायांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 'गुन्हेगार होऊन काय तुरुंगात जायचं, गुन्हेगारांना सुधारण्यासाठी तुरुंगात जाईन,' असं आसारामनं त्याच्या प्रवचनात म्हटलं होतं. 

Web Title: asarams that wish becomes true after he got lifetime imprisonment in rape case