शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

मुस्लिमांचे हितचिंतक काल कुठे होते? तिहेरी तलाकवरून ओवेसींचा विरोधी पक्षांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 6:09 PM

तिहेरी तलाक विधेयकावरील मतदानावेळी विरोधी पक्षांच्या मतांना लागलेल्या सुरुंगावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयक काल राज्यसभेमध्ये पारित झाले. त्यामुळे या संदर्भात कायदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयकावरील मतदानावेळी विरोधी पक्षांच्या मतांना लागलेल्या सुरुंगावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुस्लिमांचे हितचिंतक म्हणवणारे पक्ष काल कुठे होते, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तिहेरी तलाक विधेयकाबाबत विरोधी पक्षांनी राज्यसभेत घेतलेल्या भूमिकेवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ''समाजवादी पार्टी, बसपा आणि इतर मोठमोठे पक्ष स्वत:ला मुस्लिमांचे हितचिंतक म्हणवतात. पण हे पक्ष काल कुठे होते, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. काल मतदानावेळी यांचे खासदार कुठे होते.'' दरम्यान, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवाले या निर्णयाचा विरोध करतील, अशी आशा ओवेसींना आहे. 

 तिहेरी तलाक विधेयकाबाबत राज्यसभेत होणाऱ्या मतदानापूर्वी खासदारांना व्हिप जारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यावरून ओवेसी यांनी काँग्रेसला टोला हाणला आहे. ''व्हिप जारी करण्यासाठी नेमका किती वेळ लागतो? तरीही हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र गुलाम नबी आझाद, असं सांगत असतील तर ते धक्कादायक आहे. आता तर फोनवरसुद्धा व्हिप जारी होऊ शकतो.''असे ओवेसी म्हणाले.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी