"चारमीनार आमच्या अब्बांची इमारत, अब्बांच्या समोर या’’, उत्तर प्रदेशात ओवेसींचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 06:47 PM2021-09-27T18:47:26+5:302021-09-27T19:16:05+5:30

Asaduddin Owaisi News: आज कानपूरमध्ये झालेल्या सभेत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून ओवेसींनी आपले लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये हैदराबादमधील प्रसिद्ध चारमीनार हा आपल्या अब्बांची इमारत असल्याचा दावा केला.

Asaduddin Owaisi Says, "Charminar, our father's building, come in front of our father" | "चारमीनार आमच्या अब्बांची इमारत, अब्बांच्या समोर या’’, उत्तर प्रदेशात ओवेसींचे वादग्रस्त विधान

"चारमीनार आमच्या अब्बांची इमारत, अब्बांच्या समोर या’’, उत्तर प्रदेशात ओवेसींचे वादग्रस्त विधान

googlenewsNext

कानपूर - काही महिन्यांवर आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही सलग रॅली आणि सभा घेऊन मुस्लिमांना आपल्या पारड्यात खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, आज कानपूरमध्ये झालेल्या सभेत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून ओवेसींनी आपले लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये हैदराबादमधील प्रसिद्ध चारमीनार हा आपल्या अब्बांची इमारत असल्याचा दावा केला. तसेच मुस्लिमांची स्थिती बँडवाल्यांसारखी आहे. ज्यांना लग्नात बाहेर उभे केले जाते, असेही ते म्हणाले. (Asaduddin Owaisi Says, "Charminar, our father's building, come in front of our father" )

ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी हैदराबादच्या जनतेला लाख सलाम, आम्ही भाजपाला पुन्हा पराभूत केले. नरेंद्र मोदींनी स्वत: येऊन माझ्याविरोधात सभा घेतली. तुमचे मुख्यमंत्री बाबा सुद्धा प्रचारासाठी आले होते. नंतर ते राहुल गांधीही आले होते. चारमीनारजवळ जलसा केला. तेव्हा आम्ही सांगितले होते की चारमीनार आमच्या अब्बांची इमारत आहे. अब्बांच्या समोर या.

जाजमऊच्या अकील कंपाऊंडमध्ये आयोजित सभेमध्ये ओवेसींनी सांगितले की, मुस्लिम हे वरातीमधील त्या बँड पार्टीप्रमाणे झाले आहेत, ज्यांना आधी बाजा वाजवण्यास सांगितले जाते. मात्र वर लग्नस्थळी पोहोचल्यावर बँडवाल्यांना बाहेरच थांबवले जाते. आता मुसलमान बँड वाजवणार नाही. तर आम्ही लोकशाहीचा बाजा वाजवू, प्रत्येक जातीमध्ये एक नेता आहे. मात्र मुस्लिमांचा कुणी नेता नाही आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम लोकसंख्या १९ टक्के आहे. मात्र त्यांचा एकही नेता नाही. मरण्याआधी उत्तर प्रदेशात १०० मुस्लिम नेते तयार व्हावेत, अशी माझी इच्छा आहे.

ओवेसींनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांनी ठरवले पाहिजे की, २०२२ मध्ये ते केवळ मत देणारे बनणार की नेता बनणार? आपणा बँडबाजावाले बनता कामा नये. ज्या समाजाचा नेता असतो. त्या समाजाला मान दिला जातो. मात्र मुस्लिमांचा कुणीही नेता नाही आहे. मुस्लिमांना एक होऊन मत द्यावे लागेल. ओवेसींनी सांगितले की, मुस्लिम आता जागृत झाले नाहीत तर नुकसान होईल. पोलिसांनी मौलाना कलीम सिद्धिकींना तुरुंगात पाठवले. मात्र काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि समाजवाद्यांनी काहीच सांगितले नाही. त्यांचे मतदार दुरावतील याची त्यांना चिंता आहे. 
 

Web Title: Asaduddin Owaisi Says, "Charminar, our father's building, come in front of our father"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.