asaduddin owaisi said rss planning his murder | संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी

संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी

हैदराबाद: भाजपा खासदार धर्मापुरी अरविंद यांनी एमआयएम अध्यक्ष आणि हैदराबाद लोकसभेत खासदार असलेले असद्दुदीन ओवेसी यांना क्रेनला लटकवून दाढी कापून टाकण्याची धमकी दिली होती. त्यांनतर आता ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा केला आहे.

तेलंगणामधील निजामाबाद मतदारसंतून निवडून आलेले भाजपा खासदार धर्मापुरी अरविंद यांनी एका सभेला संबोधित करताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध कणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली होती. ''मी असदुद्दीन ओवैसींना इशारा देतोय की मी तुम्हाला क्रेनला उलटे टांगून तुमची दाढी कापून टाकेन. त्यानंतर ती दाढी मुख्यमंत्र्यांना (चंद्रशेखर राव) चिटकवून तिला प्रमोशन देईन,'' असे विधान धर्मपुरी अरविंद यांनी केले होते.

यावरून ओवेसी म्हणाले की, 'आरएसएस माझ्या हत्येचे कट रचत आहे. पण मी कुणाला घाबरत नाही. मी शहीद होण्यासाठी तयार आहे. तसेच मी शहरात एकटा फिरत असतो. त्यामुळे या आणि मला गोळ्या घाला. तारीख सुद्धा मी ठरवतो, तुम्ही या आणि मला मारून टाका', असे ओवेसी म्हणाले आहेत.

 

 

 

Web Title: asaduddin owaisi said rss planning his murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.