शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Video : भारतीय राजदूतानं घेतली तालिबानी नेत्याची भेट; ओवेसींनी खडा केला असा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 17:42 IST

Owaisi On Taliban: 

नवी दिल्ली -अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे आणण्यासंदर्भात आणि इतरही काही  मुद्द्यांसंदर्भात, कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी मंगळवारी दोहा येथे तालिबानी नेत्याची भेट घेतली. कुठल्याही तालिबानी नेत्यासोबतची भारत सरकारची ही पहिलीच औपचारिक भेट होती. या भेटीसंदर्भात विरोधी पक्षांनी केंद्रावर निशाणा साधला असताना, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही, सरकारला सवाल करत, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.

तालिबानच्या भेटीवरून ओवेसींचा सवाल - ओवेसी म्हणाले, हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा आहे. त्यामुळे, तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? यासंदर्भात भारताने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. याच बरोबर ओवेसी यांनी यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या दौऱ्यासंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, आपण 7 सप्टेंबरला फैजाबाद, 8 सप्टेंबरला सुलतानपूर आणि 9 सप्टेंबरला बाराबंकीला जाणार आहोत. याशिवाय, येणाऱ्या निवडणुकीत योगी सरकारला पराभूत करण्यासाठी आपण इतरही काही ठिकाणी दौरे करणार आहोत, असेही ते म्हणाले.

बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती

ओमर अब्दुल्लांनीही विचारला होता सवाल - अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा भारतावर काय परिणाम होईल, असा प्रश्न सामान्यांना पडला असताना, यावर प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, तालिबानचा जम्मू-काश्मीरवर काय परिणाम होईल, याबाबत केंद्रातील मोदी सरकारला विचारायला हवे. तसेच तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हेही मोदी सरकारने स्पष्ट करायला हवे, अशी मागणी ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत