धुळीच्या वादळामुळे दिल्लीत तब्बल ३५० विमाने हवेत जागेवरच थांबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 08:02 IST2025-04-13T07:58:29+5:302025-04-13T08:02:37+5:30
Delhi Dust Storm News: दिल्लीतून विमान उड्डाण व विमाने उतरण्यास परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट करून केवळ तीन रन-वे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

धुळीच्या वादळामुळे दिल्लीत तब्बल ३५० विमाने हवेत जागेवरच थांबली
नवी दिल्ली : दिल्लीविमानतळावर शुक्रवारी रात्रीपासून वाईट हवामानावर हवाई वाहतूक विस्कळीत झाली. अचानक घोंगावणारे वारे आणि धुळीच्या वादळाने विमानांच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झाला. परिणामी, शनिवारी ३५०हून अधिक उड्डाणांना विलंब झाला आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विमानांना होत असलेला विलंब आणि विमानतळावर निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचे व्हिडीओ प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. शुक्रवारी रात्री वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम शनिवारी सायंकाळपर्यंत जाणवत होता.
विमानांची झाली गर्दी
इंडिगोने हवाई वाहतूक विमानांच्या गर्दीमुळे विस्कळीत झाल्याचे नमूद केले. दिल्लीतून विमान उड्डाण व विमाने उतरण्यास परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट करून केवळ तीन रन-वे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
सरासरी ४० मिनिटे विलंब
विमानांच्या उड्डाणांवर देखरेख करणारी वेबसाइट ‘फ्लायटरडार२४ डॉट कॉम’च्या आकडेवारीनुसार ३५०हून अधिक उड्डाणे विलंबाने झाली. सर्व विमानांचा एकूण सरासरी विलंब हा ४० मिनिटांचा होता.