महाकुंभमेळ्यात झाले तब्बल ३ वर्ल्ड रेकॉर्ड; तुम्ही विचारही केला नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:22 IST2025-02-28T04:22:11+5:302025-02-28T04:22:47+5:30

महाकुंभात एकूण ४ नवीन विश्वविक्रम झाले, त्यापैकी ३ विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले.

As many as 3 world records were set at the Mahakumbh Mela; You may not have even thought about it... | महाकुंभमेळ्यात झाले तब्बल ३ वर्ल्ड रेकॉर्ड; तुम्ही विचारही केला नसेल...

महाकुंभमेळ्यात झाले तब्बल ३ वर्ल्ड रेकॉर्ड; तुम्ही विचारही केला नसेल...

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभ ही एक ऐतिहासिक घटना ठरली कारण या महाकुंभाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक नवीन नावे नोंदवली. गुरुवारी महाकुंभाचा अनौपचारिक समारोप झाला आणि या काळात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची
टीम संगमच्या काठावर पोहोचली आणि त्यांनी या अनोख्या कामगिरीची घोषणा केली. 

महाकुंभात एकूण ४ नवीन विश्वविक्रम झाले, त्यापैकी ३ विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटच्या स्नानाने झाला. या विशेष कार्यक्रमाची जगभरात चर्चा होत आहे. कारण जगभरातील लोकांनी यापूर्वी कधीही श्रद्धेचा इतका महासागर पाहिलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी ३ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सादर केले आणि या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला. (वृत्तसंस्था)

विक्रम १ : ३६० स्वयंसेवकांची चार ठिकाणी गंगा स्वच्छता

गंगा स्वच्छतेच्या प्रयत्नांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विशेष मोहिमेत ३६० स्वयंसेवकांनी मिळून ४ वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता केली आणि ही मोहीम आता एक नवा विक्रम बनली आहे.

विक्रम २ : १० हजार लोकांनी एकत्रित रंगविली चित्रे

सामूहिक चित्र रंगवण्यात एक नवीन विक्रम करण्यात आला. १०,१०२ लोकांनी एकत्रित चित्रे रंगवली. या पूर्वीचा विक्रम ७,६६० लोकांचा होता. तो महाकुंभमध्ये त्याहूनही मोठ्या प्रमाणात तोडण्यात आला. 

विक्रम ३ : १९ हजार लोकांनी एकाच वेळी झाडून काढले

महाकुंभमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी १९ हजार लोकांनी एकाच वेळी झाडून काढून झाडू अभियान मोहीम पूर्ण केली. यापूर्वी एकाचवेळी १० हजार लोक झाडू अभियानात सहभागी झाले होते.

६६.३०
कोटीहून अधिक भाविक आले होते.
४,०००
हेक्टर क्षेत्रात झाला महाकुंभमेळा.
७०,०००
हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात होते. 
४५
दिवसांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० वेळा दौरा केला. 
१३,०००
ट्रेन चालविण्यात येणार होत्या, मात्र  १६ हजारांहून अधिक ट्रेन चालवल्या. 

Web Title: As many as 3 world records were set at the Mahakumbh Mela; You may not have even thought about it...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.