केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:41 IST2025-07-04T11:41:05+5:302025-07-04T11:41:47+5:30
Rakha Gupta Delhi CM House Renovation: भाजपाच्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. पीडब्ल्यूडी विभागाने आता रेखा यांच्यासाठी बंगल्याच्या रिनोवेशनचे काम हाती घेतले आहे.

केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या भाजपने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या सरकारी निवासस्थानावरील खर्चावरून जोरदार टीका केली होती, त्याच पक्षाच्या आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासाठी ६० लाखांचे टेंडर काढण्यात आले आहे. यावरून रेखा गुप्तांवर मायामहल म्हणून टीका होऊ लागली आहे.
भाजपाच्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. पीडब्ल्यूडी विभागाने आता रेखा यांच्यासाठी बंगल्याच्या रिनोवेशनचे काम हाती घेतले आहे. यासाठी तब्बल ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी टेंडर काढण्यात आले असून त्यात केवळ ९ लाखांहून अधिक किंमतीचे टीव्हीच लागणार आहेत. यावरून काँग्रेस आणि आपने रेखा गुप्तांच्या या निवासस्थानाला मायामहल म्हणण्यास सुरुवात केली आहे.
रेखा गुप्ता यांच्यासाठी दोन बंगले देण्यात आले होते. यापैकी पहिल्या बंगल्याच्या रिनोवेशवनसाठी टेंडर जारी करण्यात आले आहे. या बंगल्यात स्वत: मुख्यमंत्री राहणार आहेत. तर दुसरा बंगला हा कॅम्प ऑफिस म्हणून वापरला जाणार आहे. यावरून टीका होऊ लागताच रेखा यांनी ते घर जनतेसाठी असणार असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान केजरीवालांचा शीषमहल असल्याने भाजपनेच बदनाम केले आहे. यामुळे रेखा या तिथे राहण्यासाठी जाणार नव्हत्या. यामुळे भाजपाने रेखा यांच्यासाठी उपराज्यपालांचे कार्यालय खाली करून घेतले आहे. त्याच्या सुशोभिकरणासाठी २ टनाचे १४ एसी, ९ लाखांचे पाच स्मार्ट टीव्ही, १६ भिंतीवरील पंखे, दोन लाखांचे युपीएस, ६.०३ लाखांच्या लाईट, ५.१४ लाखांचे सीसीटीव्ही, १.८ लाख रुपयांचे २३ प्रिमिअम पंखे लावले जाणार आहेत. एवढेच नाही तर ६ लाखांच्या ११५ डेकोरेटीव्ह लाईट देखील लावल्या जाणार आहेत. गिझरच ९१ हजार रुपयांचे बसविले जाणार आहेत. ८५ हजारांचे ओव्हन टोस्टर ग्रील, ७७ हजारांचे डीशवॉशर, १ लाख रुपयांचे मायक्रोवेव्ह असा सारा खर्च असणार आहे.