शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

केजरीवालांनी राजीनामा दिला नाही, मग तुम्ही का दिला? मनीष सिसोदियांनी सांगिले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:51 IST

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची अलीकडेच जामीनावर सुटका करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ते अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात कैद होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केंद्रातील BJP सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा 'आप' पक्ष फोडण्याचा कट फसला, आमचे नेते एकजुटीने उभे आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे कारणही सांगितले.

उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला?मनीष सिसोदिया यांनी हिंदी वृत्तवाहिनी टीव्ही 9 शी संवाद साधताना म्हटले की, 'मला राजीनामा दिल्याचा पश्चाताप नाही. मी राजकारणात खूप नंतर आलो. सुरुवातीला मी माझ्या पत्रकारितेच्या काळात रस्त्यावर उतरलो. माहितीच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर राजकारणात आलो. राजकारणात आल्याचाही मला पश्चाताप नाही. जनतेच्या आशीर्वादानेच मला काही घटनात्मक पदे भूषवण्याची संधी मिळाली.'

राजीनाम्याच्या प्रश्नावर सिसोदिया म्हणाले की, 'एखाद्या मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे सरकार पडत नाही, त्याच्या जागी त्याचे काम दुसऱ्याला देता येते. पण, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, तर सरकार पडते, सरकार बदलते. मी राजीनामा देणे आणि अरविंद केजरीवालांनी राजीनामा देणे, यात मोठा फरक आहे. माझ्या अटकेनंतर केजरीवालांनी शिक्षण क्षेत्रातील काम पुढे आतिशी यांना जबाबदारी दिली. अरविंद केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे, कुठेतरी सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.'

निवडणुकीपर्यंत तुरुंगात ठेवण्याचे षडयंत्र सिसोदिया पुढे म्हणतात, 'ड्रग्ज माफियांविरोधात जे गुन्हे दाखल होता, ते गुन्हे माझ्यावर दाखल केले. माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचले गेले. दिल्ली निवडणुकीपर्यंत मला तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे सरकार पाडायचे असेल, तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर पीएमएलए कलम लादून सरकार पाडा, ही अत्यंत वाईट परंपरा होत चालली आहे,'  अशी टीकाही सिसोदियांनी यावेळी केली. 

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीjailतुरुंगBJPभाजपा