दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मंगळवारी (१४ जानेवारी) सांगितलं की, दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा उघडपणे पैसे वाटत आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
केजरीवाल म्हणाले, त्यांच्या पक्षाने (भाजपा) प्रत्येकी १०,००० रुपये पाठवले, पण त्यांच्या नेत्यांना वाटतं की, ते जिंकणार नाहीत, म्हणून ते पैसे कमावताहेत. त्यांच्या नेत्यांनी प्रत्येकी ९,००० रुपये स्वत:कडे ठेवले आणि प्रत्येकी १,००० रुपये वाटले. तेही सर्वांना दिले गेले नाही. लोकांना याबद्दल आता माहिती होत असल्याने त्यांच्यात संतापाचं वातावरण आहे.
पत्रकार परिषदेत दावा केला की, त्यांच्या नेत्यांनी जनतेच्या नावावर आलेले पैसे खाऊन टाकले आहेत. त्यांचे नेते जिथे जिथे जात आहेत तिथे जनता त्यांना पैसे जपून ठेवण्यास सांगत आहे. त्यांच्या लोकांनी काही ठिकाणी ब्लँकेट वाटले आणि इतर ठिकाणी वाटले नाहीत, याबद्दलही लोक संतापले आहेत. लोक विचारत आहेत की आमचे ब्लँकेट, साड्या, बूट आणि जॅकेट कुठे गेले? त्यांनी काही कॉलनीमध्ये सोन्याच्या चेनचं वाटपही केलं.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "हे लोक म्हणत आहेत की, आम्ही मतं खरेदी करू. मी लोकांना आवाहन करतो की, जे काही मिळेल ते घ्या, भांडून भांडून घ्या. त्यांच्या ऑफिसमध्ये जा आणि ते घ्या, पण तुमचं मत विकलं जाऊ देऊ नका. आपलं मत मौल्यवान आहे, हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आहे."
"मी असं म्हणत नाही की, तुम्ही आपला मतदान करा, पण जे पैसे वाटत आहेत त्यांना देऊ नका. हे गद्दार आहेत. त्यांना देश विकत घ्यायचा आहे, ते अहंकारी आहेत. त्यांचे पैसे वाया घालवा. दिल्लीतील लोकांना विकत घेता येत नाही हे सिद्ध करा. यावेळी या गुंडांना सांगा की दिल्लीचे लोक विकले जात नाहीत."