अरविंद केजरीवाल यांना जामीन हा अपवाद नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून टीकेचे ‘स्वागत’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:20 AM2024-05-17T09:20:53+5:302024-05-17T09:21:18+5:30

ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. खन्ना यांनी शाह यांच्या टीकेचे अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. 

arvind kejriwal bail is no exception supreme court welcomes criticism | अरविंद केजरीवाल यांना जामीन हा अपवाद नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून टीकेचे ‘स्वागत’

अरविंद केजरीवाल यांना जामीन हा अपवाद नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून टीकेचे ‘स्वागत’

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ईडीने अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देताना कोणताही अपवाद करण्यात आलेला नाही. न्यायालयाच्या निर्णयाची टीकात्मक समीक्षा किंवा त्यावरील टीकेचे आम्ही ‘स्वागत‘ करतो, अशी प्रतिक्रिया गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केली.

केजरीवाल यांना जामीन मिळणे हा नियमित निकाल नसून त्यांना देण्यात आलेली विशेष वागणूक असल्याचे देशातील बहुतांश जनतेचे म्हणणे आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली होती. गुरुवारी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. खन्ना यांनी शाह यांच्या टीकेचे अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. 

 

Web Title: arvind kejriwal bail is no exception supreme court welcomes criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.