अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आढळले मृतावस्थेत

By admin | Published: August 9, 2016 10:57 AM2016-08-09T10:57:04+5:302016-08-09T12:14:35+5:30

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे

Arunachal Pradesh chief minister found dead | अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आढळले मृतावस्थेत

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आढळले मृतावस्थेत

Next
ऑनलाइन लोकमत - 
इटानगर. दि. 9 - अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. 47 वर्षीय कलिखो पूल हे फेब्रुवारी ते जुलै 2016 या काळात अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. नुकतंच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं होतं.
 
डिसेंबर 2015 मध्ये कालिखो पूल यांनी काँग्रेसशी बंडखोरी केली होती. भाजपाच्या पाठिंब्यान ते मुख्यमंत्रीदेखील झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही निवड बेकादयदेशीर असल्याचं सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कालिखो पूल यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. इटानगरमधील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळाला आहे. त्यांच्या घराचं नूतनीकरण चालू असल्याने त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलं नव्हतं. 
 
 

Web Title: Arunachal Pradesh chief minister found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.