आयएसआयसाठी काम करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:32 IST2018-05-25T01:32:01+5:302018-05-25T01:32:01+5:30

पैशांसाठी तो अत्यंत गोपनीय माहिती पाकच्या गुप्तचर यंत्रणेला पोहोचवायचा.

IS arrested for working for ISI | आयएसआयसाठी काम करणाऱ्यास अटक

आयएसआयसाठी काम करणाऱ्यास अटक

लखनऊ : पाकिस्तानमधील एका भारतीय राजनैतिक अधिकाºयाच्या घरी स्वयंपाकी म्हणून गेली दोन वर्षे काम करताना पैशाच्या बदल्यात आयएसआयसाठी हेरगिरी करणाºया रमेश सिंह नावाच्या ३५ वर्षांच्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे.
पैशांसाठी तो अत्यंत गोपनीय माहिती पाकच्या गुप्तचर यंत्रणेला पोहोचवायचा. रमेश सिंह उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्यात राहणारा आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने लष्करी गुप्तचर व उत्तराखंड पोलिसांच्या साह्याने अटक केली. रमेशवर इस्लामाबादमध्ये राजनैतिक अधिकाºयाच्या घरात राहत असताना मायक्रोफोनद्वारे हेरगिरी करून गोपनीय माहिती आयएसआयला पुरवली, असा आरोप आहे. त्याचा मोठा भाऊ भारतीय लष्करात आहे. रमेशला अटकेनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर लखनऊला तपासणीसाठी आणण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: IS arrested for working for ISI