शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 00:59 IST

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे. 

ठळक मुद्देलश्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदचे आहेत हे दहशतवादीदहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळ जाण्यापूर्वी सतर्कता बाळगण्याचे आदेश जवानानांना देण्यात आले आहेतहे दहशतवादी उत्तरी काश्मीरच्या गुलमर्ग येथून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती

नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी झुंज देत असताना, पाकिस्तानात मात्र 300 दहशतवादीभारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यातच हे दहशतवादीभारतात रक्ताचा खेळ खेळण्याचा कट आखत आहेत. यासंदर्भात गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर, भारतीय लष्कराने सीमेवरील जवानांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अनेक दहशतवादी असू शकतात कोरोनाग्रस्त -भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे. 

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

पाक लष्कराने 16 लॉन्च पॅड केले आहेत अॅक्टीव्ह -पाकिस्तानातून लश्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदचे जवळपास 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने आयएसआयच्या मदतीने नौशेरा आणि छम्बच्या काही भागांत एलओसीजवळ 16 दहशतवादी तळ सुरू केले आहेत. हे दहशतवादी उत्तरी काश्मीरच्या गुलमर्ग येथून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती, लष्कराच्या फील्ड इंटेलिजंन्स युनिटला मिळाली आहे. 

दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळ जाण्यापूर्वी सतर्कता बाळगण्याचे आदेश -अधिकाऱ्यांकडून निर्देश देण्यात आले आहेत, की सीमेवर दहशतवादी अथवा घुसखोरांशी सामना झाल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाजवळ जाण्यापूर्वी अत्यंत सतर्कता बाळगा. त्यांच्यातील अधिकांश दहशतवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे.

खूशखबर...कोरोनावरील लसीची चाचणी करण्यात आलेली महिला म्हणाली, 'Doing Fine'!

पाकिस्तानातील एजन्सीज दहशतवाद्यांना करतायेत मदद -पाकिस्तानातील एजन्सीज दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषा पार करण्यासाठी मदत करत आहेत. गेल्या काही दिवसांत सीमा रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. गोळीबाराच्या आडून दहशतवादी आणि कोरोना संक्रमितांना भारतात पाठवण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे. मात्र, भारतानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीIndiaभारतPakistanपाकिस्तानSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानBorderसीमारेषाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद