शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धोका वाढला! Black Fungus चा 26 राज्यांत कहर; 20,000 रुग्णांवर उपचार सुरू, प्रशासनाच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:36 IST

20000 Patients Of Black Fungus : देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. रुग्णावर उपचार सुरू असतानाच उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. देशातील 26 राज्यांत ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. तब्बल 20 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. रुग्णावर उपचार सुरू असतानाच उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. या इंजेक्शनचा इतका मोठा तुटवडा आहे, की एकूण मागणीच्या दहा टक्केही इंजेक्शनही सध्या उपलब्ध नाहीत. केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सोमवारी माहिती दिली की केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एम्फोटेरिसिन-बीचे अतिरिक्त 30,100 डोस पाठवले आहेत. एम्फोटेरिसिन-बीचा उपयोग ब्लॅक फंगसच्या उपचारात केला जातो. हा आजार नाक, डोळे आणि कधीकधी मेंदूवर वाईट परिणाम करतो.

गौडा यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.सर्व राज्य/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना आज एम्फोटेरिसिन-बीचे 30,100 डोस पाठवले गेले आहेत. यात महाराष्ट्राला सर्वाधिक 5,900 आणि गुजरातला 5,630 उपलब्ध करुन दिले आहेत. यापाठोपाठ आंध्र प्रदेश 1,600, मध्य प्रदेश 1,920, तेलंगणा 1,200, उत्तर प्रदेश 1,710, राजस्थान 3,670, कर्नाटक 1,930 आणि हरियाणाला 1,200 दिले गेले आहेत. देशात अजूनही केवळ एक लाखाच्या आसपासचं एम्फोटेरिसिन-बीच्या उत्पादनाची क्षमता आहे. अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हवेली, लडाख,लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिजोराम, सिक्किम आणि नागालँड वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण रुग्णालयांमध्ये  उपचार घेत आहेत.

बंगळुरुच्या मणिपाल रुग्णालयातील डॉक्टर हेगडे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली, की ब्लॅक फंगसच्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन करावं लागत आहे. मात्र तरीही त्यांचा जीव वाचवणं कठीण होत आहे. आतापर्यंत त्यांना अनेक रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. काही रुग्ण सुरुवातीची लक्षणं दिसताच रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, वेळेवर औषध आणि इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा (Black Fungus) मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत