लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 20:16 IST2024-12-24T20:16:29+5:302024-12-24T20:16:39+5:30

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

Army vehicle falls into 350 feet deep gorge; 5 soldiers killed, many injured | लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी...

लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी...

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात 8 ते 10 जवान होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जाणारे 11 एमएलआयच्या लष्करी वाहनाचा घोरा पोस्टजवळ अपघात झाला. वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत कोसळले. माहिती मिळताच 11 एमएलआयची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले.

भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला. "पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना वाहन अपघातात पाच शूर सैनिकांच्या दुःखद मृत्यूबद्दल #WhiteKnightCorps आम्ही शोक व्यक्त करतो. जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे," असे या पोस्टमध्ये म्हटले.

गेल्या महिन्यातही अपघात झाला
गेल्या महिन्यात अशाच एका अपघातात जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दुसरा जखमी झाला होता. 4 नोव्हेंबर रोजी कालाकोटच्या बडोग गावाजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये नाईक बद्री लाल आणि हवालदार जय प्रकाश गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान लाल यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Army vehicle falls into 350 feet deep gorge; 5 soldiers killed, many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.