Jammu And Kashmir: नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 04:56 PM2019-08-23T16:56:27+5:302019-08-23T17:15:09+5:30

पाकिस्ताने पुन्हा एकदा  शुक्रवारी नौशेरा सेक्टरमध्ये सीमारेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लघंन केलं.

Army Trooper Killed in Pakistan Firing Along LoC in Jammu and Kashmir's Nowshera sector | Jammu And Kashmir: नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद

Jammu And Kashmir: नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद

Next

जम्मू- काश्मीर: जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान वारंवार सीमारेषेवर शस्त्रसंधीच उल्लंघन करत आहे. पाकिस्ताने पुन्हा एकदा  शुक्रवारी नौशेरा सेक्टरमध्ये सीमारेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लघंन केलं. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. तसेच या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. 

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या कलसिया गावातील एका चौकीवर हा जवान तैनात होता. पाकिस्तानने सकाळीच केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. यानंतर त्या जवानाला रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान अखेर जवानानं जीव सोडला. 

याआधीही  जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 ऑगस्ट) चकमक झाली होती. त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले होते. तसेच या चकमकीत एक जवान शहीद तर एक जवान जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे.  पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीमुळे नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने स्थानिक रहिवाशांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Army Trooper Killed in Pakistan Firing Along LoC in Jammu and Kashmir's Nowshera sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.