जम्मू काश्मीरातून अफ्सपा हटवण्यास लष्कराचा विरोध
By Admin | Updated: February 20, 2016 21:45 IST2016-02-20T21:42:39+5:302016-02-20T21:45:13+5:30
जम्मू-काश्मीरमधून वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा(अफ्सपा) हटवण्यास लष्कराने विरोध केला आहे. अफ्सपा हटवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जाणार असेल तर त्याला लष्कर विरोध करणार आहे

जम्मू काश्मीरातून अफ्सपा हटवण्यास लष्कराचा विरोध
>ऑनलाइन लोकमत -
पठाणकोट, दि. 20 - जम्मू-काश्मीरमधून वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा(अफ्सपा) हटवण्यास लष्कराने विरोध केला आहे. अफ्सपा हटवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जाणार असेल तर त्याला लष्कर विरोध करणार आहे. अफ्सपा हटवल्यास जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा घुसखोरी आणि बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढू शकते असा दावा लष्कराने केला आहे.
जम्मू काश्मीरातून अफ्सपा काढण्यात येऊ नये असं मतं लेफ्टनंट जनरल के जे सिंग यांनी व्यक्त केलं आहे. काही राजकीय पक्ष जम्मू काश्मीरातून अफ्सपा मागे घेण्याची मागणी करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
अफ्सपा 1958 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आला होता. सुरुवातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा या ठिकाणी हा कायदा लागू करण्यात आला होता. मणिपूर सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात जात 2004मध्ये राज्यातल्या अनेक भागातून हा कायदा हटवला होता
जम्मू काश्मीरमध्ये 1990 मध्ये अफ्सपा लागू करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये वाढणा-या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभुमीवर अफ्सपा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून हा कायदा लष्कराच्या अंतर्गत आहे. या कायद्याअंतर्गत जम्मू काश्मीरमधील लष्कराला कोणालाही विना वॉरंट अटक करण्याचा अधिकार आहे. जर ती व्यक्ती अटकेला विरोध करत असेल तर जबरदस्तीने अटक करण्याचाही अधिकार लष्कराच्या जवानांना आहे.