स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 06:17 IST2025-08-04T06:16:49+5:302025-08-04T06:17:41+5:30

२६ जुलै रोजी दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-३८६ या फ्लाइटच्या बोर्डिंगदरम्यान घडलेली ही घटना रविवारी उजेडात आली...

Army officer attacks SpiceJet employees; spine jaw broken, 4 injured | स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 

स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 

सुरेश एस डुग्गर -

श्रीनगर : श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या ग्राउंड स्टाफवर लष्करातील लेफ्टनंट कर्नलने थेट हल्ला चढवत चौघांना गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कर्मचाऱ्याची मणक्याची हाडे मोडली असून दुसऱ्याचा जबडा तुटला आहे. इतर दोन कर्मचाऱ्यांनाही मोठा मार लागला आहे. २६ जुलै रोजी दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-३८६ या फ्लाइटच्या बोर्डिंगदरम्यान घडलेली ही घटना रविवारी उजेडात आली.

लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव असून गुलमर्ग येथील हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलमध्ये ते सध्या तैनात आहेत. विमान सायंकाळी ६:१० वाजता श्रीनगरहून दिल्लीसाठी रवाना होणार होते. २४डी सिंह यांचा सीट क्रमांक होता. त्यांच्याकडे १६ किलोच्या दोन केबिन बॅग होत्या. ७ किलोपेक्षा जास्त वजन नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते. मात्र, सिंह यांनी शुल्क भरण्यास नकार दिला आणि बोर्डिंग पास न घेताच ते थेट एरोब्रिजमध्ये घुसले. सुरक्षा नियमांचे हे मोठे उल्लंघन असल्याने कर्मचाऱ्यांने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिंह यांनी कर्मचाऱ्यांना थेट मारहाण सुरू केली.

अशी केली ठोसाठोशी : सिंह यांच्या मारहाणीत एका कर्मचाऱ्याचा मणका फ्रॅक्चर झाला. दुसऱ्याचा जबडा तुटला. तिसऱ्याच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला तर चौथा कर्मचारी जागेवरच बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेतही त्याला सिंह यांनी लाथांनी बुकलले. त्याला मदत करायला आलेल्या कर्मचाऱ्यालाही जबर मार बसला.

‘नो-फ्लाय’ यादीत, लष्कराकडूनही चौकशी
पोलिसांनी एफआयआर दाखल केला असला तरी अद्याप सिंह यांना वृत्त लिहिस्तोवर अटक झाली नव्हती. स्पाइसजेटने त्यांना ‘नो-फ्लाय’ यादीत टाकले असून नागरी उड्डयन मंत्रालयालाकडे तक्रार केली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. लष्करानेही या घटनेची दखल घेतली असून, सिंह यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
 

Web Title: Army officer attacks SpiceJet employees; spine jaw broken, 4 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.