Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 14:46 IST2025-05-13T14:45:59+5:302025-05-13T14:46:23+5:30
Rambabu Singh : छपरानंतर आता बिहारच्या सिवान येथील रहिवासी असलेले जवान रामबाबू सिंह हे शहीद झाले.

Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
छपरानंतर आता बिहारच्या सिवान येथील रहिवासी असलेले जवान रामबाबू सिंह हे शहीद झाले. सोमवारी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे त्यांना गोळी लागली. रामबाबू सिंह हे एअर डिफेंस सिस्टम S-400 चालवत होते. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार दुपारी झाला. संध्याकाळी बातमी आली की रामबाबू देशासाठी शहीद झाले.
शहीद जवान रामबाबू सिंह हे सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील रामविचार सिंह हे हरिहरपूर पंचायतीचे उपसरपंच होते. रामबाबू सिंह यांचे भाऊ अखिलेश सिंह हे झारखंडमधील हजारीबागमध्ये लोको पायलट म्हणून काम करतात.
लष्कर मुख्यालयातून आला फोन
रामबाबू यांचे सासरे सुभाष चंद्र शर्मा यांनी सांगितलं की, त्यांचे जावई भारताची एअर डिफेंस सिस्टम S-400 चालवत होते. १० एप्रिल रोजी ते जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्युटीवर रुजू झाले. त्याची मुलगी धनबादमध्ये होती. काल (सोमवार) दुपारी १.३० वाजता, लष्कर मुख्यालयातून फोन आला की गोळी लागली आहे. यानंतर रामबाबू शहीद झाल्याची माहिती मिळाली.
काल पत्नीशी झालेलं बोलणं
पत्नी अंजली सिंह यांना अद्याप रामबाबू शहीद झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. रामबाबू यांचं पोस्टिंग हे जोधपूरला झालं होतं मात्र भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान त्यांना तिथेच थांबवण्यात आलं. काल सकाळी १० वाजता रामबाबू यांचं पत्नी अंजलीशी बोलणं झालं होतं. तोपर्यंत सर्व ठीक होतं अशी माहिती सासऱ्यांनी दिली आहे.
चार महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
शहीद जवान रामबाबू सिंह यांचं लग्न अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालं होतं. गावातील लोक त्याचं पार्थिव येण्याची वाट पाहत आहेत. पार्थिव संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पर्यंत येईल अशी माहिती देण्यात आली आहे. शहीद जवानाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबाबू यांना लहानपणापासूनच देशसेवेची आवड होती. त्यामुळेच ते सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करत होते. या घटनेनंतर गावातील लोकांचे डोळे पाणावले आहेत. सर्व गावकऱ्यांना त्यांचा अभिमान वाटत आहे.