सलाम... भारतीय लष्कराचा 18 हजार फुटांवर विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:24 AM2018-12-26T05:24:15+5:302018-12-26T11:06:52+5:30

जम्मू-काश्मीरमधील सियाचिन ग्लेशियरमध्ये १८ हजार फुटांवर बिघाड झाल्याने अडकलेले हेलिकॉप्टर दुरुस्त करून लष्करातील तंत्रज्ञ व पायलटने पुन्हा तळछावणीला आणले.

 Army helicopter fixes 18,000 feet, maximum in Siachen | सलाम... भारतीय लष्कराचा 18 हजार फुटांवर विश्वविक्रम

सलाम... भारतीय लष्कराचा 18 हजार फुटांवर विश्वविक्रम

Next

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधीलसियाचिन ग्लेशियरमध्ये १८ हजार फुटांवर बिघाड झाल्याने अडकलेले हेलिकॉप्टर दुरुस्त करून लष्करातील तंत्रज्ञ व पायलटने पुन्हा तळछावणीला आणले. इतक्या उंचीवर अशा प्रकारची कामगिरी पहिल्यांदाच झाली असून तो एक प्रकारचा विश्वविक्रम आहे. खांडा नावाच्या पोस्टवर या हेलिकॉप्टरचे इमर्जंसी लँडिंग करण्यात आले होते. त्यावेळी पायलयने आपल्या चतुनराईने बर्फावर या हेलिकॉप्टरचे लँडिंग केलं होते.

भारतीय सैन्याचे ध्रुव हेलिकॉप्टर जानेवारीत सियाचिनमध्ये गेले असता त्यात बिघाड झाला. त्यामुळे ते तेथील खांडा चौकीनजिक बर्फाळ जमिनीवर उतरविण्यात आले. हेलिपॅडपर्यंत जाणे त्याला शक्य झाले नव्हते. पाच महिने ते तेथेच होते. तंत्रज्ञांनी ते जुलैमध्ये दुरूस्त करून परत आणले. हे मिशन यशस्वी करण्यात भारतीय सैन्यातील टेक्निशियन आणि पायलट यांनी महत्वाची भूमिका बजावली. जानेवारी महिन्यात या हेलिकॉप्टरचे इमर्जंन्सी लँडिंग करण्यात आले होते. विशेष म्हणजे पायलटला हे हेलिकॉप्टर एका बर्फाळ जागेवर लँडिंग करता आले. त्यानंतर, संपूर्ण रात्रभर हेलिकॉप्टरच्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तेव्हापासून जुलै महिन्यापर्यंत यामध्ये कुणालाही यश आले नाही. भारतीय सैन्याच्या अथक प्रयत्नाने टेक्निशिय टीम आणि पायलट यांच्या मिशनला जुलै महिन्यात पहिले यश मिळाले. त्यानंतर, सहजच या हेलिकॉप्टरला पुन्हा तळछावणीला आणण्यात आले.

आर्मी कॅम्पचे माजी एव्हिएशन चीफ लेफ्टनंट जनरल पी.के.भराली यांनी याबाबत माहिती दिली. या मिशनमध्ये काम केलेल्या टेक्निशियन्स आणि पायलटला मी चांगल ओळखतो. कारण, मी दोन वर्षे या पथकाचा प्रमुख म्हणून काम केलं आहे. मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की, या पथकाला आणि भारतीय सैन्याला काहीही अशक्य नाही, असे भराली यांनी म्हणत आपल्या सैन्याचे कौतूक केले. 18 हजार फूट उंचीवरुन या हेलिकॉप्टरचे रिकवर करणे म्हणजे एक विश्वविक्रम आहे. कारण, एवढ्या उंचीवर हेलिकॉप्टर चालवणाऱ्या मोजक्याच देशांपैकी भारत हा एक देश आहे. भारतीय सैन्याचे चीता आणि चेतक हे हेलिकॉप्टर (चॉपर) तब्बल 23 हजार उंचीवर उडते. विशेष म्हणजे या दोन्ही चॉपरमध्ये फ्रान्सचे तंत्रज्ञान आहे, पण फ्रान्सकडूनही एवढ्या उंचीवर हे हेलिकॉप्टर उडविण्यात येत नसल्याची माहितीही भराली यांनी दिली. 

Web Title:  Army helicopter fixes 18,000 feet, maximum in Siachen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.