अरुणाचल प्रदेशात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले, शोध मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 14:33 IST2023-03-16T14:30:55+5:302023-03-16T14:33:49+5:30

अरुणा प्रदेशमध्ये लष्काचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडली.

army cheetah helicopter crashed near mandala in arunachal pradesh | अरुणाचल प्रदेशात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले, शोध मोहीम सुरू

अरुणाचल प्रदेशात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले, शोध मोहीम सुरू

अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे 'चित्ता' हे हेलिकॉप्टर  क्रॅश झाले आहे. आज सकाळी ०९.१५ च्या सुमारास या हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ एक ऑपरेशनल उड्डाण केले आणि काही वेळातच हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. नंतर बोमडिला पश्चिमेकडील मंडलाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.सध्या शोध मोहीम सुरू आहे.

गुवाहाटीमधील संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी या संदर्भात माहिती दिली. 'अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ ऑपरेशन सॉर्टीसाठी उड्डाण करणाऱ्या चित्ता हेलिकॉप्टरचा गुरुवारी सकाळी ०९.१५ वाजता एटीसीशी संपर्क तुटला. बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याचे माहिती मिळत  असल्याची माहिती रावत यांनी दिली.

Web Title: army cheetah helicopter crashed near mandala in arunachal pradesh