तरुणीला फ्लाईंग किस दिल्याने वाद, तरुणाला मारहाण, मग त्याच्या नातेवाईकांकडून पीडितांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:46 IST2025-10-13T20:44:21+5:302025-10-13T20:46:07+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील अमझेरा मारहाणीची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने एका तरुणीला फ्लाईंग किस दिल्याने संतापलेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी सदर तरुणाला पकडून बेदम मारहाण केली.

तरुणीला फ्लाईंग किस दिल्याने वाद, तरुणाला मारहाण, मग त्याच्या नातेवाईकांकडून पीडितांना प्रत्युत्तर
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील अमझेरा मारहाणीची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने एका तरुणीला फ्लाईंग किस दिल्याने संतापलेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी सदर तरुणाला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाच्या नातेवाईकांनीही पीडित तरुणीच्या घरात घुसून तिच्या नातेवाईकांना माराहाण केली. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, तिचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दुचारीवरून जाणाऱ्या एका तरुणाने रस्त्यातून जात असलेल्या एका तरुणीला फ्लाईंग किस दिलाय त्यामुळे संतापलेल्या तरुणीच्या निकटवर्तीयांना या तरुणाला पकडून त्याला आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. त्यानंतर आरोपी तरुणानेही आपल्या निकटवर्तीयांना बोलावून घेतले. तसेच पीडित तरुणीच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच अमझेरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही पक्षांच्या तक्रारींच्या आधारावर एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा व्हिडीओ पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सुरू आहे.