अँड्रॉइडवरील ॲप्सचा डेटावर डल्ला, ५८ लाख जणांचे फेसबुक पासवर्ड चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:58 AM2021-07-06T07:58:16+5:302021-07-06T07:59:04+5:30

गुगलने ५ जुलै रोजी हे सर्व ॲप्स प्लेस्टोअरवरून काढून टाकले आहेत.

Apps on Android data hacked, 5.8 million Facebook passwords stolen | अँड्रॉइडवरील ॲप्सचा डेटावर डल्ला, ५८ लाख जणांचे फेसबुक पासवर्ड चोरीला

अँड्रॉइडवरील ॲप्सचा डेटावर डल्ला, ५८ लाख जणांचे फेसबुक पासवर्ड चोरीला

Next

नवी दिल्ली : अँड्रॉइड सुरक्षा अधिकाधिक कशी कडेकोट करता येईल, यासाठी गुगल गेल्या काही वर्षांपासून कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही त्यासाठी आणखी बरेच करणे बाकी आहे. अँड्रॉइड मोबाइलवर डाऊनलोड करण्यात आलेल्या काही ॲप्सच्या माध्यमातून ५८ लाख युझर्सच्या फेसबुकचे पासवर्ड्स चोरले गेल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे.

कशी व्हायची पासवर्ड चोरी?
-  युझरच्या गुगल किंवा फेसबुक अकाऊंटला गेल्यावर या ॲप्सची बनावट जाहिरात दर्शवली जायची. अनेक युझर्स त्यास बळी पडून त्यावर क्लिक करत.
-  युझरने लॉग-इन केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटवरील कुकीज व पासवर्ड्सची चोरी करणे, हे काम ॲप्स करत.

खालील नऊ ट्रोजन ॲप्सच्या माध्यमातून झाली पासवर्ड चोरी
-  पीआयपी फोटो
-  प्रोसेसिंग फोटो
-  रबीश क्लीनर
-  हॉरोस्कोप डेली
-  ॲप लॉक कीप
-  लॉकिट मास्टर
-  हॉरोस्कोप पाय
-  ॲप लॉक मॅनेजर
-  इनवेल फिटनेस

पासवर्ड चोरी झाली असेल तर काय?
वर देण्यात आलेल्या नऊ ॲप्सपैकी कोणतेही ॲप तुम्ही डाऊनलोड केले असेल तर तातडीने तुमच्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड बदलून टाका.

अखेर बंदी आणली
-  गुगलने ५ जुलै रोजी हे सर्व ॲप्स प्लेस्टोअरवरून काढून टाकले आहेत.
-  या ॲप्सच्या डेव्हलपर्सवर बंदी घातली आहे. याचा अर्थ ते आता नवीन ॲप्स प्लेस्टोअरवर आणू शकणार नाहीत.

60 लाख लोकांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे सर्व ॲप्स डाऊनलोड केली होती. त्यापैकी ५८ लाख युझर्सच्या फेसबुक पासवर्ड्सची चोरी.

Web Title: Apps on Android data hacked, 5.8 million Facebook passwords stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.