... तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत ‘नो एन्ट्री’, भाजप खासदाराची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 06:07 IST2022-05-06T06:07:17+5:302022-05-06T06:07:52+5:30

उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी राज यांच्यावर केला असल्याचा त्यांचा आरोप.

apologize first till raj thackeray wont get entry in ayodhya uttar pradesh bjp mp said | ... तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत ‘नो एन्ट्री’, भाजप खासदाराची भूमिका

... तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत ‘नो एन्ट्री’, भाजप खासदाराची भूमिका

राजेंद्र कुमार
लखनौ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांना अयोध्येत येता येईल, अन्यथा त्यांना प्रवेशबंदी करू असा इशारा भाजपचे खासदार बृजभूषण शरणसिंह यांनी दिला आहे. राज ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. 

राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्याशी चर्चा करू नये, असे आवाहनही सिंह यांनी केले आहे. बृजभूषण यांनी गुरुवारी ट्वीटरवरून राज ठाकरे यांच्यावर टीका केली. उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी राज यांच्यावर केला. त्यांच्या या ट्वीटवर भाजपाच्या कोणत्याही वरिष्ठ मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: apologize first till raj thackeray wont get entry in ayodhya uttar pradesh bjp mp said