रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:31 IST2025-07-16T13:18:11+5:302025-07-16T13:31:34+5:30

आतापर्यंत अमेरिकेने सुमारे २० देशांना हे हेलिकॉप्टर दिले आहेत. भारत पाकिस्तानच्या सीमेवर हे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारी करत आहे.

Apache helicopters that can attack even in the dark of night will arrive from America; Will be deployed on the Pakistan border | रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात

रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात

पाकिस्तानच्या कुरापतींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने मोठं पाऊल उचलले आहे. अमेरिकेकडून अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची डिलिव्हरी या आठवड्यात होणार आहे. पहिल्या कन्साइनमेंट अंतर्गत एकूण तीन अपाचे हेलिकॉप्टर मिळणार आहेत. हे रात्रीच्या अंधारातही लक्ष्य शोधून त्यावर मारा करू शकतील. अमेरिकन सैन्यात बऱ्याच काळापासून तैनात असलेल्या या हेलिकॉप्टरना मोठी मागणी आहे. 

आतापर्यंत अमेरिकेने सुमारे २० देशांमध्ये हे हेलिकॉप्टर पोहोचवले आहेत. भारत पाकिस्तानच्या सीमेवर हे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारी करत आहे. आता लवकरच हे हेलिकॉप्टर भारताला मिळणारअसल्याबाबत बातम्या समोर आल्या होत्या.

"आजचं युद्ध कालच्या शस्त्रांनी जिंकू शकत नाही, त्यासाठी..."; CDS प्रमुख अनिल चौहान यांचे विधान

या हेलिकॉप्टरना 'एअर टँक' असेही म्हणतात. अमेरिकेतून येणारे AH-64Es अपाचे हेलिकॉप्टर गाझियाबादमधील हिंडन एअर फोर्स स्टेशनवर उतरतील. भारतीय लष्कराने या हेलिकॉप्टरसाठी आधीच एक वेगळा ताफा तयार केला आहे. जोधपूरमध्ये हे १५ महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. पण हेलिकॉप्टरची डिलिव्हरी रखडली होती. ट्रम्प प्रशासनाकडून ट्रेड डीलवर काम सुरू होते यामुळे ही डिलिव्हरी रखडल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवाई दलाचे पठाणकोट आणि जोरहाटमध्ये आधीच दोन स्क्वॉड्रन सक्रिय आहेत.

२०२३ मध्ये भारतीय सैन्याला मिळाले

२०१५ मध्येही भारत सरकारने अमेरिकेसोबत २२ अपाचे हेलिकॉप्टरचा करार केला होता. त्या ऑर्डरची डिलिव्हरी जुलै २०२० मध्ये अमेरिकेने केली होती. त्यानंतर २०२० मध्ये भारताने आणखी ६ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता. याअंतर्गत, पहिल्या कन्साइनमेंटची डिलिव्हरी मे ते जून २०२४ दरम्यान होणार होती. पण त्यात विलंब होत राहिला. अमेरिकन कंपनी बोईंग आणि टाटा यांच्याकडून हैदराबादमध्ये एक संयुक्त उपक्रम देखील सुरू आहे. येथे बनवलेले अपाचे हेलिकॉप्टर २०२३ मध्ये भारतीय सैन्याला मिळाले. 

Web Title: Apache helicopters that can attack even in the dark of night will arrive from America; Will be deployed on the Pakistan border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.