Anurag Thakur: सर्वोच्च न्यायालयाने भारीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI) चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने 2017 मधील आपल्या आदेशात सुधारणा करत, अनुराग ठाकुर यांच्यावर लादलेली बीसीसीआयशी संबंधित सर्व प्रकारची बंदी हटवली आहे. त्यामुळे ते आता पुन्हा बीसीसीआयच्या कामकाजात, बैठकींमध्ये आणि संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील.
2017 च्या ‘सीज अँड डेसिस्ट’ आदेशात सुधारणा
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2017 मध्ये दिलेल्या आदेशानुसार, अनुराग ठाकुर यांना बीसीसीआयच्या कोणत्याही कामकाजापासून दूर राहण्याचे (‘Cease and Desist’) निर्देश देण्यात आले होते. त्या आदेशात आता सुधारणा करत न्यायालयाने स्पष्ट केले की, बीसीसीआयच्या नियम व नियमनांनुसार अनुराग ठाकुर यांना बोर्डाशी संबंधित सर्व उपक्रमांत सहभागी होता येईल. यामुळे त्यांच्यावरील जुनी बंदी पूर्णतः रद्द झाली आहे.
बीसीसीआय अध्यक्षपदावरून हटवण्याची पार्श्वभूमी
अनुराग ठाकुर यांची 2016 मध्ये बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, लोढा समितीच्या शिफारसी अंमलात न आणल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये त्यांना पदावरून हटवले होते. या आदेशासोबतच त्यांच्याविरोधात अवमानना आणि खोटी साक्ष दिल्याचे आरोपही पुढे आले होते. मात्र, त्याच वर्षी काही प्रकरणांत त्यांना अंशतः दिलासा मिळाला होता.
‘मला ऐकून न घेता आदेश देण्यात आला’, ठाकुरांचा दावा
हिमाचल प्रदेशचे भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या अनुराग ठाकुर यांनी 2017 चा आदेश मला ऐकून न घेता दिला गेला होता, असा युक्तिवाद करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा मुद्दा मान्य करत आदेशात सुधारणा करून बंदी हटवण्याचा निर्णय दिला आहे.
Web Summary : The Supreme Court has lifted the ban on Anurag Thakur, allowing him to participate in BCCI activities. The 2017 order restricting him from BCCI involvement has been amended after Thakur argued he wasn't heard.
Web Summary : सुप्रीम कोर्ट ने अनुराग ठाकुर पर लगा प्रतिबंध हटा दिया है, जिससे वे बीसीसीआई गतिविधियों में भाग ले सकेंगे। ठाकुर की दलील के बाद 2017 का बीसीसीआई में उनकी भागीदारी को प्रतिबंधित करने वाला आदेश बदल दिया गया।