शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 19:04 IST

Jammu Kashmir Terrorism, Indian Army found Satellite Communication Device:जम्मूमध्ये भारतीय लष्कर, स्थानिक पोलिसांचा विशेष ऑपरेशन ग्रुप आणि BSF ची संयुक्त मोहीम

Jammu Kashmir Terrorism, Indian Army found Satellite Communication Device: जम्मू-काश्मीरमध्येदहशतवाद्यांच्या कारवाया खोडून काढण्यासाठी भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने (SOG) राबवलेल्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेले एक सक्रिय 'सॅटेलाईट कम्युनिकेशन डिव्हाइस' (Satellite Communication Device) सापडले आहे. यामुळे सीमापार बसलेल्या देशविरोधी कारवाया करणाऱ्या गटांशी संपर्क साधण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न उधळून लावले गेले आहेत.

तांत्रिक युद्धावर सुरक्षा दलांची नजर - जम्मूच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तांत्रिक उपकरणांचा शोध घेण्यात आला. जप्त करण्यात आलेले सॅटेलाईट डिव्हाइस हे अतिशय प्रगत असून, त्याचा वापर इंटरनेट किंवा सामान्य मोबाईल नेटवर्कशिवाय संवाद साधण्यासाठी केला जात होता. या उपकरणाच्या माध्यमातून दहशतवादी नियंत्रण रेषेच्या (LoC) पलीकडून सूचना घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर - नव्या वर्षाच्या सुरुवातीला जम्मूमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दहशतवादी दुर्गम भागातील गुहा आणि नैसर्गिक लपण्याच्या जागांचा वापर करत असल्याचे लक्षात आल्यानंतर लष्कराने हाय-टेक पाळत ठेवणारी यंत्रणा (Hi-tech Surveillance) सक्रिय केली आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे स्थानिक नेटवर्क आणि बाह्य संपर्क तोडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

सर्च ऑपरेशन सुरूच - जप्त केलेले डिव्हाइस सध्या फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले असून, त्यातील डेटा डिकोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे दहशतवाद्यांचे पुढील कट आणि त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. यादरम्यान, संपूर्ण परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून सीमा भागातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jammu: Terrorists' satellite device seized, cross-border communication disrupted.

Web Summary : Security forces in Jammu and Kashmir recovered a satellite communication device used by terrorists. This disrupted their ability to communicate with groups across the border. The device is being analyzed to uncover further plots and locations. Search operations are ongoing, and security has been heightened.
टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिसterroristदहशतवादी