“पंतप्रधान कार्यालयातील हिंदुत्व विरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:11 IST2020-03-02T13:11:26+5:302020-03-02T13:11:43+5:30

देशभक्त अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणले जात आहे.

 Anti Hindutva officer in PM office touch with Sharad Pawar | “पंतप्रधान कार्यालयातील हिंदुत्व विरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात”

“पंतप्रधान कार्यालयातील हिंदुत्व विरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात”

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयात हिंदुत्व विरोधी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे आणि हे अधिकारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला आहे.

स्वामी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, पंतप्रधान कार्यालयात हिंदुत्व विरोधी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. त्यांच्याकडून देशभक्त अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणले जात आहे. त्यांना कारवाई करू दिली जात नाही. तर असे काही अधिकारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. तर देशभर CAA विरोधी वातावरण आणि दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे असंही ते म्हणाले

देशातील सर्वात महत्वाचं आणि मोठं कार्यालय म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडे पाहिले जाते. त्यातच या कर्यालयात असलेले अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू असल्याचे सुद्धा बोलले जाते. मात्र असे असताना सुद्धा सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केलेल्या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

 

 

Web Title:  Anti Hindutva officer in PM office touch with Sharad Pawar