Anthony Albanese Australia PM Modi: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले की त्यांची पुनर्निवड ऑस्ट्रेलियन जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला "शाश्वत विश्वास" दर्शवते. ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अल्बानीज यांनी विजयी झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पोस्टमध्ये अल्बानीज यांना टॅग करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल आणि तुमच्या प्रचंड विजयाबद्दल अँथनी अल्बानीज यांचे अभिनंदन! ऑस्ट्रेलियन जनतेने तुमच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे तुम्हाला पुन्हा निवडून दिले आहे."
पंतप्रधान मोदींनी सहकार्य वाढवण्यावर दिला भर
पंतप्रधान मोदींनी दोन्ही इंडो-पॅसिफिक लोकशाहींमधील वाढत्या भागीदारीवर प्रकाश टाकला आणि प्रादेशिक सहकार्याला चालना देण्यासाठी अल्बेनीज सरकारसोबत काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. ते म्हणाले, "भारत-ऑस्ट्रेलिया धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यास आणि इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी सामायिक धोरणे पुढे नेण्यासाठी एकत्र काम करण्यास मी उत्सुक आहे."
मार्च २०२३ मध्ये अल्बानीज भारतात आले होते
मार्च २०२३ मध्ये अल्बानीज भारताला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी धोरणात्मक भागीदारीअंतर्गत सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे लोक राहतात आणि दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून लोकांमधील संबंधांवर नियमितपणे भर दिला आहे.
२१ वर्षांत प्रथमच पंतप्रधान पुन्हा निवडून आले
ऑस्ट्रेलियाच्या राजकारणाच्या इतिहासात गेल्या २१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखादा विद्यमान पंतप्रधान सलग दुसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येण्याची पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र धोरणात, विशेषतः इंडो-पॅसिफिकसाठी सातत्य राखण्यासाठी अल्बानीज यांचा हा विजय महत्त्वाचा आहे.