गौरी लंकेश हत्या प्रकरणी अजून एका संशयिताला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 10:55 IST2018-08-30T10:54:21+5:302018-08-30T10:55:37+5:30

Gauri Lankesh Murder Case: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Another suspect arrested in connection with the murder of Gauri Lankesh | गौरी लंकेश हत्या प्रकरणी अजून एका संशयिताला अटक 

गौरी लंकेश हत्या प्रकरणी अजून एका संशयिताला अटक 

बेळगाव -  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्याकांडाचा तपास करत असलेल्या बंगळुरू एसआयटीच्या पथकाने बेळगाव येथून सागर लाले नावाच्या तरुणाला अटक केली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला आश्रय दिल्याचा आरोप लाले याच्यावर ठेवण्यात आला आहे.  

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्यांमागे एकाच विचाराच्या व्यक्ती असल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त होत होता. तपासातून सध्या ज्या गोष्टी पुढे येत आहेत. दरम्यान, या चारही विचारवंतांची हत्या एकाच पिस्तुलाने करण्यात आल्याचेही समोर आले होते. 



 

Web Title: Another suspect arrested in connection with the murder of Gauri Lankesh