शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दिल्लीत आणखी एक घोटाळा? आरोग्य विभागात 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, आता CBI करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 16:59 IST

मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता.

दिल्लीतील आरोग्य विभागाने काही औषधांची खरेदी केली होती. मात्र, ही खरेदी करताना अनेक नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि भष्टाचार झाला, असा आरोप आहे. यातच आता, या प्रकरणी उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर आता दिल्लीमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता. सीबीआय चौकशीला मंजुरी - या प्रकरणी एसीबीने 2017 मध्ये चौकशी सुरू केली होती. एसीबीच्या शिफारशीनंतर उपराज्यपाल सक्सेना यांनी सीबीआय चौकशीला मंजुरी दिली. यानंतर, या चौकशी आदेशाबरोबरच आपचे उत्तरही आले आहे. "एलजींकडे यापूर्वीच एका अधिकाऱ्यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. दिल्ली सरकारने आधीच आरोग्य सचिव दीपक कुमार यांना पदावरून हटविण्याची शिफारस एलजींकडे केली आहे," असे आपने म्हटले आहे. आरोग्य सचिव दीपक कुमार यांनी फरिश्ते योजनाही थांबवली होती, असा आरोप आहे. दिल्ली सरकारने आधीच या अधिकाऱ्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तसेच, आरोग्य सचिव दीपक कुमार यांच्या विरोधात एलजी कारवाई करणार का, असा सवालही आपने केला आहे. 

कपिल मिश्रा यांचा आरोप -मिळालेल्या माहितीनुसार, "दिल्लीच्या आरोग्य विभागात "नको असलेल्या औषध" खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाला झाला आहे. तसेच, आरोग्य मंत्री सत्येन्द्र जैन देखील या घोटाळ्यात सामील होते, असा दावा कपिल मिश्रा यांनी केला होता. आता हे प्रकरण कुठपर्यंत जाते आणि चौकशीतून काय समोर येते हे बघावे लागेल.

सध्या व्हिजिलन्स विभागाच्या अहवालाला आधार माणून CBI चौकशीची शिफारस करत, दिल्लीचे एलजी विनय कुमार सक्सेना यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हे चिंताजनक आहे. लाखो रुग्णांना ही औषधी दिली जात आहे. एवढेच नाही, तर औषध खरेदीसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केल्यामुळेही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एका अहवालानुसार, व्हिजिलन्स विभागाचे म्हणणे आहे की,  सरकारी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्या आलेल्या 43 नमुन्यांपैकी 3 नमूने अयोग्य आहेत. तर 12 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तसेच, खाजगी प्रयोगशाळांना पाठवलेल्या इतर 43 नमुन्यांपैकी 5 नमुने अयोग्य आले आहेत. तर 38 नमुने योग्य आढळून आले आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCBIगुन्हा अन्वेषण विभागCorruptionभ्रष्टाचारAam Admi partyआम आदमी पार्टी