हनी ट्रॅप प्रकरणात लष्कराचा आणखी एक अधिकारी गुप्तचर यंत्रणांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 17:58 IST2018-02-14T17:58:25+5:302018-02-14T17:58:48+5:30
मध्य प्रदेशमध्ये हनी ट्रॅप प्रकरणात लष्करातील एक लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिका-याच्या परिसरात छापा टाकण्यात आला आहे. त्यानंतर आर्मी इंटेलिजन्सच्या अधिका-यांनी त्याला ताब्यात घेतलं.

हनी ट्रॅप प्रकरणात लष्कराचा आणखी एक अधिकारी गुप्तचर यंत्रणांच्या ताब्यात
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये हनी ट्रॅप प्रकरणात लष्करातील एक लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिका-याच्या परिसरात छापा टाकण्यात आला आहे. त्यानंतर आर्मी इंटेलिजन्सच्या अधिका-यांनी त्याला ताब्यात घेतलं. सूत्रांच्या माहितीनुसार, हा अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. संशयित हालचालींच्या आधारावर गुप्तचर यंत्रणांनी जबलपूरमधल्या लष्करी वर्कशॉपमध्ये कारवाई केली होती. त्यानंतर अधिका-याला लष्कराच्या काऊंटर इंटेलिजन्स विंगद्वारे ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच कोणी अधिकारी या जाळ्यात अडकलाय, असं नाही.
यापूर्वीही हवाई दलाच्या मुख्यालयातील एका ग्रुप कॅप्टनला कथित स्वरूपात हेरगिरी आणि संवेदनशील दस्तावेज मिळवण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं. हवाई दलाच्या सूत्रांनी तशी माहिती दिली होती. हा अधिकारी हनी ट्रॅपमध्ये तर अडकले नाहीत ना, याचा तपास अधिकारी तपास करतायत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा अधिकारी एक महिलेला संवेदनशील दस्तावेजांचे फोटो पाठवत असल्याचा तपास अधिका-यांना संशय आहे.
तसेच पाकिस्तानकडच्या हेरगिरीचा तो एक भाग तर नाही ना, याचाही तपास सुरू आहे. हा अधिकारी एका अनधिकृत इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या मदतीनं बारीक हालचालींवर नजर ठेवून असल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर असं करण्याची कोणालाही परवानगी नाही. तो सोशल मीडियावर एका महिलेच्या संपर्कात होता. परंतु त्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. सद्यस्थितीत तो हवाईदलाच्या सेंट्रल सिक्युरिटी अँड इन्व्हेस्टिगेशन टीमच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या हालचाली काऊंटर इंटेलिजन्स सर्व्हिलान्सदरम्यान समोर आल्या आहेत. त्यानं संवेदनशील दस्तावेज मिळवण्याचा प्रयत्न केला असता, त्याला गुप्तचर यंत्रणांनी ताब्यात घेतलं आहे.
Madhya Pradesh: Army officer of Lt Colonel rank detained in Jabalpur over a honey trap case. Officer is working in the Jabalpur workshop & has been detained by the counter intelligence wing of the Army. pic.twitter.com/EjhxX545qI
— ANI (@ANI) February 14, 2018