त्रिपुरामध्ये आणखी एका पत्रकाराची हत्या, जवानाने घातल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 20:15 IST2017-11-21T20:15:23+5:302017-11-21T20:15:49+5:30
त्रिपुरामध्ये आणखी एका पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. सुदिप दत्ता भोमिक असं हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव

त्रिपुरामध्ये आणखी एका पत्रकाराची हत्या, जवानाने घातल्या गोळ्या
त्रिपुरा : त्रिपुरामध्ये आणखी एका पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये पत्रकाराची हत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. सुदिप दत्ता भोमिक असं हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या (टीएसआर) जवानाने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
सुदिप हे बंगाली भाषेचं वृत्तपत्र स्यानदान पत्रिकाचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून काम करत होते. टीएसआरच्या एका कमांडंटची भेट घेण्यासाठी सुदिप हे राजधानी आगरतळा येथून 20 किमी अंतरावर असलेल्या आरके नगर येथे गेले होते. भेट घेण्यासाठी त्यांनी आगाऊ वेळ देखील घेऊन ठेवली होती. पण तेथे पोहोचल्यावर कमांडंटच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या जवानाबरोबर भौमिक यांचा वाद झाला आणि त्याने सुदिप यांच्यावर गोळी झाडली. नंदू रियांग असं गोळी मारणा-या हवालदाराचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.
यापूर्वी 20 सप्टेंबर रोजी दिन-रात या स्थानिक वृत्त वाहिनीचे पत्रकार शंतनु भौमिक यांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. कम्युनिस्ट आणि आयपीएफटी समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीची घटना कव्हर करण्यासाठी शंतनु तेथे गेले होते, त्यावेळी ही घटना घडली.