शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 10:14 IST

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून  त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून  त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. 'जैश'चा हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

नवी दिल्ली - संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून  त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. 'जैश'चा हा दहशतवादीजम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. 30 आणि 31 डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते. तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 

निसार तांत्रे हा जैशच्या दक्षिण काश्मीरचा विभागीय कमांडर नूर तांत्रे यांचा भाऊ आहे. निसारला विशेष विमानाने दिल्लीत आणले गेले. त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआय) ताब्यात देण्यात आले. एनआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. याच आधारे त्याला यूएईकडून भारतात आणले गेले. नूर तांत्रे यानेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोऱ्यात जम बसवायला मदत केली असे मानले जाते. डिसेंबर 2017 मध्ये एका चकमकीत नूरला ठार करण्यात आले. 

मागच्या काही वर्षात संयुक्त अरब अमीरातीने देशात गुन्हे करुन फरार झालेले आरोपी, दहशतवादी यांना पुन्हा भारताकडे सोपवून खरोखरचे चांगले उदाहरण समोर ठेवले आहे. यूएईने आतापर्यंत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात लाच खाण्याचा आरोप असलेला आरोपी ख्रिश्चियन मिशेल, या प्रकरणातील कथित दलाल दीपक तलवार यांच्या व्यतिरिक्त दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे समर्थक, इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद सिद्दिबापा आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी फारूख टकलासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार तांत्रे याच वर्षी भारतातून यूएईला पळून गेल्याचे सांगितले जात आहे. 

लेथपोरा प्रकरणातच पुलवामा येथील अवंतीपुराचा रहिवासी असलेल्या फय्याज अहमद मॅग्रे याला फेब्रुवारीत अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्रालचा फरदीन अहमद खांडे, पुलवामाच्या द्रुबग्रामचा रहिवासी मंजूर बाबा आणि पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल शकूर यांना ठार करण्यात आले होते. शकूर हा पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोटचा रहिवासी होता. फेब्रुवारीमध्ये एनआयने अटक केलेला फय्याज हा दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मदचा सक्रिय सदस्य होता. फय्याजने हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लपण्यासाठी जागा, हत्यारे आणि माहिती उपलब्ध केली होती.  

 

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर