शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

H3N2 व्हायरसमुळे आणखी एकाचा मृत्यू, वेगाने पसरतोय संसर्ग; 2 सब-व्हेरिअंटनं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 11:52 IST

यापूर्वी, कर्नाटकात एक 82 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. संबंधित वृद्धाला इतरही काही आजार होते. तसेच, हरियाणामध्ये या व्हायरसमुळे 52 वर्षांच्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती लिव्हर कॅन्सरचा सामना करत होती.

देशात H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. या व्हायरसमुळे गुजरातमध्ये राज्यातील पहिला मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वडोदरा येथील एका ५८ वर्षीय महिलेचा सयाजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, ही महिला हायपरटेन्शनची रुग्ण होती. H3N2 व्हायरसच्या तपासणीसाठी नमुने पुण्यातील एका प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. स्वाइन फ्लू (H1N1) च्या म्यूटेटेड व्हायरसमुळे झालेला हा देशातील हा तिसरा मृत्यू आहे.

यापूर्वी, कर्नाटकात एक 82 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. संबंधित वृद्धाला इतरही काही आजार होते. तसेच, हरियाणामध्ये या व्हायरसमुळे 52 वर्षांच्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती लिव्हर कॅन्सरचा सामना करत होती.

वेगाने पसरतोय H3N2 इन्फ्लूएंझा -भारतात एच3एन2 इन्फ्लूएंझा व्हायरसचा (H3N2 Influenza Virus) संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे आणि संक्रमणही वेगाने वाढताना दिसत आहे. आयडीएसपी-आयएचआयपीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 9 मार्चपर्यंत राज्यांतील एच3एन2 सह इन्फ्लुएंझाच्या विविध सब-व्हेरिअंटच्या एकूण 3038 एवढ्या रुग्ण संख्येची पुष्टी करण्यात आली होती. यात जानेवारी महिन्यातील 1245 रुग्णांचा, फेब्रुवारीतील 1307 रुग्णांचा आणि 9 मार्च पर्यंतच्या 486 रुग्णांचा समावेश आहे.

ही लक्षण दिसताच सावध व्हा - - H3N2 या व्हायरसच्या संसर्गात ताप, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी, डोळ्यांत जळजळ व खोकला अशी लक्षणे दिसतात. - ताप दोन-तीन दिवसांत बरा होतो. पण, घशाचा त्रास थोडा जास्त काळ राहू शकतो. - एवढेच नाहीतर, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने इतरांनाही बाधा होऊ शकते.

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले बचावात्मक उपाय -आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना एच3एन2 इन्फ्लुएंझा व्हायरसपासून (H3N2 Influenza Virus) बचावाचे उपायही सांगितले आहेत आणि काही सल्लेही दिले आहेत. यात मास्कचा वापर करा. हाताची स्वच्छता पाळा आणि वेळोवेळी हात धुवा. याच बरोबर वर्षांतून एकदा फ्लूची लस टोचून घ्या असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारतGujaratगुजरात